• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • स्वित्झर्लंडच्या महिला सैनिकांना घालावी लागत होती पुरुषी अंतर्वस्त्र; अखेर Women's underwear वापरण्यास मंजुरी

स्वित्झर्लंडच्या महिला सैनिकांना घालावी लागत होती पुरुषी अंतर्वस्त्र; अखेर Women's underwear वापरण्यास मंजुरी

2004 सालापासून महिला आणि पुरुष सैनिक समान ड्युटी करत आहेत. त्यांच्या युनिफॉर्मचा भाग म्हणून अंतर्वस्त्रसुद्धा एकसारखी देण्यात येत होती. आता मात्र महिलांना आता पुरुषांची अंतर्वस्त्र घालण्याची गरज नाही.

 • Share this:
  बर्न (स्वित्झर्लंड), 31 मार्च: महिला सैनिकांच्या अडचणी लक्षात घेत स्वित्झर्लंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिलांना आता पुरुषांची अंतर्वस्त्र घालण्याची गरज नाही. यापूर्वी महिला सैनिकांना पुरुषांची अंतर्वस्त्र परिधान करावी लागत होती. सध्याच्या गणवेशात फक्त पुरुषांच्या अंतर्वस्त्राचा समावेश होता. त्यामुळे महिला या क्षेत्राकडे वळत नव्हत्या असं सरकारच्या लक्षात आलं. महिला सैनिकांच्या भरतीला चालना मिळावी यासाठी आता त्यांना महिलांची अंतर्वस्त्र घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयाचं संरक्षण मंत्री विओला अमहर्ड यांनी स्वागत केलं आहे. हे वाचा - छळ, बलात्कार आणि खून... हे यूट्यूबर्स हिट्स मिळवण्यासाठी गाठत आहेत विकृतीचं टोक यापूर्वी महिला सैनिकांना सैल असलेली पुरुषी अंतर्वस्त्र घालावी लागत होती. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. बऱ्याच तक्रारी आल्यानंतर सरकारला जाग आली आणि अखेर महिलांच्या अंतर्वस्त्रांना परवानगी देण्यात आली आहे. आता महिलांना सैनिकी पोशाखात वावरताना अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर महिलांचा सैनिकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलणार आहे. सध्या स्वित्झर्लंड सैन्य दलात महिलांचा सहभाग केवळ एक टक्का आहे. त्यामुळे येत्या 20 वर्षात हे प्रमाण 10 टक्क्यांवर नेण्याचा मानस सरकारचा आहे. 2004 सालापासून महिला आणि पुरुष सैनिक समान ड्युटी करत आहेत.
  Published by:News18 Digital
  First published: