मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

इच्छामरणासाठी आलं नवं मशीन, एका मिनिटांत Painless मरण

इच्छामरणासाठी आलं नवं मशीन, एका मिनिटांत Painless मरण

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना आता वेदनारहित मृत्यूला सामोरं जाणं शक्य होणार आहे. त्यासाठीच्या एका मशीनची निर्मिती करण्यात आली आहे.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना आता वेदनारहित मृत्यूला सामोरं जाणं शक्य होणार आहे. त्यासाठीच्या एका मशीनची निर्मिती करण्यात आली आहे.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना आता वेदनारहित मृत्यूला सामोरं जाणं शक्य होणार आहे. त्यासाठीच्या एका मशीनची निर्मिती करण्यात आली आहे.

  • Published by:  desk news

बर्न, 7 डिसेंबर: इच्छामरण पत्करणाऱ्यांसाठी एका (Suicide machine) मशीनचा शोध शास्त्रज्ञांनी लावला असून  (Painless machine) कमीत कमी त्रास व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. स्वित्झर्लंडमध्ये हे मशीन तयार झालं असून त्याला कायदेशीर (Legally approved) मान्यता देण्यात आली आहे. अनेकांना नाईलाजाने इच्छामरण पत्करायचे असते, मात्र मृत्यूसमयी होणाऱ्या वेदना असह्य होतात.  हे टाळण्यासाठी स्वित्झर्लंडनं या मशीनला परवानगी दिली असून मृत्यूला सामोरे जाणाऱ्यांना वेदनारहित मृत्यूचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

असं चालतं मशीन

स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण कायदेशीर मानलं गेलं आहे. त्यासाठी व्यक्तीला तिथे गुन्हेगार मानलं जात नाही. इच्छामरणाचा निर्णय निश्चित झाल्यानंतर व्यक्तीला या मशीनमध्ये येऊन झोपावं लागेल. मशीनमध्ये झोपलेल्या व्यक्तीच्या हातातच मृत्यूचा कंट्रोल असणार आहे. या मशीनमध्ये ती व्यक्ती काही काळ शांतपणे पडून राहू शकेल. या काळात व्यक्तीने आपला विचार बदलला, तर ती त्यातून बाहेर येऊ शकते. मात्र विचार करूनही जर व्यक्ती मरणाच्या निर्णयावर ठाम राहिली, तर मशीनच्या आत बसवलेलं बटण व्यक्तीला दाबावं लागेल. हे बटन दाबल्यानंतर मशीन बंद होईल आणि आतील ऑक्सिजन लेव्हल कमी होईल. लवकरच व्यक्ती बेशुद्ध होईल आणि त्यातच तिचा मृत्यू होऊ शकेल.

आत्महत्या करण्यासाठी कॉफिनच्या आकाराचे मशीन

इच्छामरणाला आहे परवानगी

स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाला कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच ज्याला मरण पत्करण्याची इच्छा असेल, ती व्यक्ती इतर व्यक्तींच्या मदतीनं मृत्यूला सामोरी जाऊ शकते.

हे वाचा- Shocking! 6 महिने आईच्या मृतदेहासोबत राहिली मुलगी; कारण जाणून बसेल धक्का

पुढील वर्षी मशीन बाजारात

स्वित्झर्लंड सरकारनं या मशीनला परवानगी दिली असून पुढील वर्षी ते बाजारात येणार आहे. इच्छामरण पत्करू पाहणाऱ्या अनेकांना याचा फायदा होणार असून त्यांच्या मृत्यूसमयीच्या वेदना कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या संकल्पनेवर टीका होत असून अशी परवानगी देणं असंवेदनशील असल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Death, Suicide