उत्तरप्रदेशात 'स्विस' जोडप्याला मारहाण, परराष्ट्र मंत्रालयाकडून दखल

उत्तरप्रदेशात 'स्विस' जोडप्याला मारहाण, परराष्ट्र मंत्रालयाकडून दखल

उत्तर प्रदेशात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी जोडप्याला अमानुष मारहाण करण्यात आलीय. आग्रानजीकच्या फतेपूर सिक्रीत हा प्रकार घडलाय. विदेशी महिलेसोबत सेल्फी घेण्याच्या वादातून या विदेशी पर्यटकांना ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तात्काळ या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून उत्तरप्रदेश सरकारला यासंबंधीचा अहवाल मागितलाय.

  • Share this:

आग्रा, 26 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी जोडप्याला अमानुष मारहाण करण्यात आलीय. आग्रानजीकच्या फतेपूर सिक्रीत हा प्रकार घडलाय. विदेशी महिलेसोबत सेल्फी घेण्याच्या वादातून या विदेशी पर्यटकांना ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. सर्वाधिक खेदाची बाब म्हणजे या मारहाणीवेळी उपस्थित जमावाने त्यांची सोडवणूक करण्याऐवजी त्यांचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तात्काळ या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून उत्तरप्रदेश सरकारला यासंबंधीचा अहवाल मागितलाय.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, स्वित्झर्लंडमधील क्यून्टीन जर्मी क्लर्क (वय २४) आणि त्याची प्रेयसी मारी ड्रोझ हे विदेशी पर्यटक जोडपं सप्टेंबरपासून भारत भेटीवर आलंय. रविवारी क्यून्टीन आणि त्याची प्रेयसी ड्रोझ हे दोघे फतेहपूर सिक्री येथील रेल्वे रुळावरुन चालत असताना एका स्थानिक टोळक्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह धरला त्याला मारीने विरोध करताच त्यांना अमानुष मारहाण करण्या आली. ‘आम्ही जात असताना चौघांनी आमच्याकडे बघून शेरेबाजी केली. यानंतर चौघांनी आमचा पाठलाग सुरु केला. काही वेळातच त्यांनी आम्हाला अडवले आणि मारीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. याला विरोध दर्शवताच चौघांनी आम्हाला मारहाण केली’, आम्ही रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होतो. मदतीसाठी याचना करत होतो. पण कोणीही आमच्या मदतीला आले नाही. याऊलट अनेक जण आमचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते’ असे क्यून्टीन जर्मी क्लर्कने पोलिसांना सांगितले.

ड्रोझला वाटत होते की ते चौघे महिलेला मारहाण करणार नाहीत. तिने मला वाचवण्याचा प्रयत्न करताच त्यांनी तिलादेखील मारहाण केली, असे क्यून्टीन सांगतो. त्यांनी आमच्यावर हल्ला का केला हेच मला समजत नाही, असे त्याने म्हटले आहे. या दाम्पत्यावर सध्या दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विदेशी पर्यटक मारहाणीच्या घटनेचा सर्वच थरांमधून निषेध होतोय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अॅन्टी रोमिओ आता कठंय ? असा सवाल अखिलेश सिंह यांनी उपस्थित केलाय.

 

First published: October 26, 2017, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading