मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आफ्रिका खंडातील 'या' राजाला आहेत तब्बल 15 राण्या आणि 35 मुलं, आवडेल तिच्याशी करतो लग्न

आफ्रिका खंडातील 'या' राजाला आहेत तब्बल 15 राण्या आणि 35 मुलं, आवडेल तिच्याशी करतो लग्न

या 53 वर्षांच्या राजाला तब्बल 15 राण्या आणि अनेक दासी आहेत.

या 53 वर्षांच्या राजाला तब्बल 15 राण्या आणि अनेक दासी आहेत.

या 53 वर्षांच्या राजाला तब्बल 15 राण्या आणि अनेक दासी आहेत.

मुंबई, 27 मे :जगभरात राजेशाही असलेला स्वाझिलँड (Swaziland) हा कदाचित एकमेव देश राहिला आहे. नुकतंच इथला राजा मस्वति तृतीय याने या देशाचं नाव बदलून किंगडम ईस्वातिनी ठेवलं आहे. या 53 वर्षांच्या राजाला तब्बल 15 राण्या आणि अनेक दासी आहेत. त्यापैकी एका राणीचं निधन झालंय. राजाशी संग झालेली महिला जेव्हा गर्भवती होती, तेव्हाच तिला राजाच्या पत्नीचा म्हणजे देशाच्या राणीचा दर्जा दिला जातो. अन्यथा त्या केवळ दासी म्हणून राहतात.

स्वाझिलँड आफ्रिका खंडात दक्षिण आफ्रिकेला लागून आहे. या राजाचं शिक्षण विदेशात झालंय. स्वाझिलँड हा गरीब देश असला तरी इथला राजा हा त्याच्या लग्झरी लाईफ(Luxury life)आणि मौज मजेसाठी मनसोक्त पैसे खर्च करण्यासाठी चर्चेत असतो. या राजाला जर एखादी महिला आवडली तर तो तिला त्याच्या गावी म्हणजे रॉयल व्हिलेजमध्ये आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो,असं म्हटलं जातं. स्वाझिलँडचा राजा मस्वति तृतीयला 35 मुलं आहेत. त्याची प्रत्येक राणी संपूर्ण ऐशो आरामात आलिशान बंगल्यात किंवा राजवाड्यात राहते. त्यांच्या लक्झरी आयुष्यावर खर्च करण्यासाठी देशाच्या बजेटमध्ये मोठी रक्कम घोषित केली जाते.

हे ही वाचा-घडणार दोन Superb खगोलीय घटना! सुपरमून आणि चंद्रग्रहण दोन्हींचा अनुभव एकाच दिवशी

या राजावर एका मुलीला शाळेतून उचलून आणून तिच्याशीलग्नकेल्याचा आरोप आहे. याबद्दलची तक्रार अमनेस्टी इंटरनॅशनल मध्येही (Amnesty International) करण्यात आली होती. घडलेली घटना अशी की, एक 18 वर्षीय शाळकरी मुलगी ऑक्टोबर 2002 मध्ये बेपत्ता झाली होती. तिचं नाव जेना महालांगू होतं. तिच्या आईने याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती. तपासाअंती पोलिसांनी सांगितलं की, ती मुलगी रॉयल व्हिलेजमध्ये असून तिला राजाची पत्नी बनवण्याची तयारी सुरू आहे. मात्र त्या मुलीच्या आईने मुलीला परत पाठवण्याचा हट्ट धरला आणि तक्रार दाखल केली. मात्र, निकाल राजाच्या बाजूने देण्यात आला. कारण हा निकाल सुनावण्यात आला तोपर्यंत ती मुलगी दोन मुलांची आई झाली होती. 2010 मध्ये तिला राणीचा दर्जा दिला गेला. या प्रकरणाची तक्रार अमनेस्टीमध्ये करण्यात आली आणि अमनेस्टीने म्हटलं की राजा आणि त्याच्या लोकांनी महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे.

या देशात सप्टेंबर महिन्याच्या सुमारास राजा देशातील सर्व कुमारी मुलींची परेड आयोजित करतो. यात मुलींना टॉपलेस ठेवले जाते. यापैकी जी मुलगी राजाला आवडेल तिला तो सोबत नेतो. मात्र, याबाबतदेशात बरीच टीका सुरू झाली आहे. राजाच्या 15 बायका सोडून बऱ्याच दासी असल्याचंही म्हटलं जातं.

हे ही वाचा-लहान बहिणीने केलं मोठ्या बहिणीला प्रेग्नंट; गे कपलला बाळ देणाऱ्या बहिणींची चर्चा

मागील वर्षी देशातील अनेक युवतींनी या परेडला विरोध दर्शविला. बर्‍याच मुलींनी या परेडमध्ये भाग घेण्यास नकार दिला. मात्र याबाबत राजाला कळताच या मुलींच्या कुटुंबीयांना दंड भरावा लागला. दरम्यान, दरवर्षी राजा आपल्या दोन पत्नींना नॅशनल काऊंसिलर (National Counsellor) बनवून संसदेत सहभागी करतो. मात्र, याची प्रक्रिया क्लिष्ट आहे.  या देशाचा राजा स्वतःमोठ्या अभिमानाने आणि ऐशोआरामात जगतो. मात्र देशातील मोठी लोकसंख्या अतिशय गरीब (poor) आहे, असा आरोप येथील लोक राजावर करतात. येथे 63 टक्के लोकसंख्येचं रोजचं उत्पन्न 100 रुपये आहे. मात्र, कितीही टीका केली तरी राजावर फारसा परिणाम होत नाही. आणि हो एक महत्वाचं म्हणजे, या राजाच्या वडिलांनाही 125 राण्या होत्या.

First published:

Tags: South africa