मस्तीखोर मुलांनी फोडली अंडी, जोडीदारही सोडून गेला; विरहाने हंसिणीने सोडला जीव

मस्तीखोर मुलांनी फोडली अंडी, जोडीदारही सोडून गेला; विरहाने हंसिणीने सोडला जीव

Heartbreak मुळे या हंसिणीचा मृत्यू (swan died) झाल्याचं सांगितलं जातं आहे.

  • Share this:

ग्रेट मॅनचेस्टर : प्रेम, दु:खाची भावना फक्त माणसंच नाही तर पशु-पक्ष्यांमध्येही असते. हे पुन्हा दिसून आलं आहे. तुमचं मूल तुमच्यापासून कुणी हिरावून घेतलं, तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून गेला तर तुमची काय अवस्था होईल. अशीच अवस्था झाली आहे एका हंसिणीची (Swan). या हंसिणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

इंग्लंडच्या ग्रेट मॅनचेस्टरमधील हे घटना आहे. मॅनचेस्टर इव्हनिंग न्यूजच्या रिपोर्टनुसार, 20 मॅनचेस्टर कालव्याजवळ हंसाचं जोडपं राहत होतं. त्यांच्या घरट्यात सहा अंडी होती. मात्र 20 मे रोजी काही मुलांनी या अंड्यावर दगडं फेकली. ज्यामुळे अंडी फुटली. सहापैकी फक्त तीनच अंडी घरट्यात राहिली. या घटनेनंतर काही दोन अंडीही गायब झाली आणि एकच अंडं शिल्लक राहिलं.

मायकेल जेम्स मॅशन या कार्यकर्त्याने हे फोटो ऑल अबाऊच बोल्टन या फेसबुक ग्रुपवर हे फोटो शेअर केलेत. त्यांनी सांगितलं, ते गेल्या 12 आठवड्यांपासून या हंसांवर लक्ष ठेवून होते. या हंसिणीला माणसं, कुत्रे, बदकांनीही त्रास दिला.

वन्यजीव कार्यकर्त्यांनी सांगितलं, या हंसिणीचा जोडीदार हंस तीन आठवड्यांपूर्वीच तिला सोडून गेला, तो पुन्हा परतलाच नाही. स्ट्रेसमुळे तो सोडून गेला असावा असं मानलं जातं आहे आणि यानंतर दु:ख सहन न झाल्याने हंसिणीचा मृत्यू झाला.

हे वाचा - भररस्त्यात कोब्राने केली उलटी; पोटातून जे बाहेर पडलं VIDEO पाहून थक्क व्हाल

कार्यकर्ते सॅम वुड्रू यांच्या मते, हंसांचा मृत्यू हृदयाला ठेच पोहोचल्याने झाल्याने म्हणजे ब्रोकन हार्टमुळे होतो. या हंसिणीला आपली पिल्लं गमावल्याचं दु:ख तर तिला होतंच. मात्र त्यातही जेव्हा हंस तिला एकटीला सोडून गेला तेव्हा ती अधिक दु:खी झाली आणि पूर्णपणे खचली आणि तिचा मृत्यू झाला.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - जिराफाशी पंगा नकोच! गाडीचा पाठलाग करतानाचा VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

First published: June 23, 2020, 7:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading