इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती

इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती

इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षितने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे आणि त्याचं नाव त्याने किंगडम ऑफ दीक्षित असं ठेवलंय. झालं असं की इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक मोकळा प्रदेश आहे. बिर ताविल नावाचा हा भाग नो मॅन्स लँड म्हणजे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नसलेला भाग आहे.

  • Share this:

15 नोव्हेंबर : इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षितने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे आणि त्याचं नाव त्याने किंगडम ऑफ दीक्षित असं ठेवलंय. झालं असं की इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक मोकळा प्रदेश आहे. बिर ताविल नावाचा हा भाग नो मॅन्स लँड म्हणजे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नसलेला भाग आहे. याच संधीचा फायदा घेत हा प्रदेश म्हणजे आपण स्थापन केलेला नवा देश असल्याचा दावा सुयशने केला आहे. आफ्रिकेतील या भूमीवर स्वतःचे राज्य स्थापन करुन संपूर्ण जगाला आश्चर्यचा धक्का दिलाय.

सुयशनं फेसबुकवर या देशाचे फोटो पोस्ट करत स्वतःला राजा घोषित केलंय. गंमत  म्हणजे सुयशनं या देशाचा झेंडाही तयार केलाय  तर वडिलांना त्याने देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख म्हणून घोषित केलंय.

सुयश दीक्षित हा एका कंपनीचा सीईओ आहे. कैरोला तो काॅन्फरन्ससाठी गेला होता. ती संपल्यावर सहा तास प्रवास करून तो बिर ताविलला गेला. सुयश सांगतो, 'मी वाळवंटातून तिथे पोचलो. तिथे गेल्यावर कळलं या प्रदेशाबद्दल कुणीच काही दावा केलेला नाही. म्हणून मी त्याच्यावर माझा मालकी हक्क सांगितलाय. परत येताना सूर्यफुलाच्या बिया तिथे पेरून आलोय.'

तसंच सुयशने थेट संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणी केलीय. आपल्याला 800हून अधिक लोकांनी पाठिंबा दिल्याचं त्यानं सांगितलं.

First published: November 15, 2017, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading