अमेरिकेत खळबळ : ओबामा आणि क्लिंटन यांच्या नावानं आली बाँब पार्सल्स

अमेरिकेत खळबळ : ओबामा आणि क्लिंटन यांच्या नावानं आली बाँब पार्सल्स

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन यांच्या नावानं बाँब पार्सल पाठवण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. ही बाँबसदृश पार्सल नेमकी कुठून आली याविषयी तपास सुरू आहे. CNNचं ऑफिस असलेल्या इमारतीतही एक बाँब पार्सल आल्याचं वृत्त आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, २४ ऑक्टोबर : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट अर्थात परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या नावानं आलेल्या टपालात स्फोटकांसदृश पदार्थ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

अमेरिकन मंत्री आणि अधिकाऱ्यांना आलेलं टपाल तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना हे संशयित बाँब पार्सल दिसलं. हे संशयित बाँब नेमके कुठे सापडले हे अजून स्पष्ट झालेलं नाही, असं BBCनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

या कथित बाँब पार्सल संदर्भातली बातमी प्रसारित करत असतानाच CNNच्या इमारतीतही बाँब पार्सल आल्याचं वृत्त आल्यानं तिथला स्टुडिओ रिकामा करण्यात आलाय. न्यूयॉर्कच्या स्टुडिओतले अँकर इमारतीखाली उभं राहून लाईव्ह रिपोर्टिंग करत असल्याचं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, पहिलं पार्सल २३ ऑक्टोबरला संध्याकाळी उशीरा सापडलं. ते हिलरी क्लिंटन यांच्या नावानं आलेलं होतं.

दुसरं संशयित बाँबचं पार्सल माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या नावानं आलं होतं. ते २४ ऑक्टोबरला सकाळी निदर्शनास आलं. न्यूयॉर्कच्या FBIनं यासंदर्भात तपास सुरू असल्याचं सांगितलंय.

बराक ओबामांच्या ऑफिसमधील प्रवक्त्यांनी यासंदर्भात काही प्रतिक्रिया व्यक्त करायला नकार दिला.

ज्येष्ठ विचारवंत आणि मानवतावादी कार्यकर्ते विचारवंत जॉर्ज सोरोस यांच्या घरातही दोन दिवसांपूर्वी बाँब पार्सल सापडलं होतं.

NBCच्या वृत्तानुसार, व्हाईट व्हाउसनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचं ट्रंप प्रशासननां कळवलं आहे. अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना या पार्सल बाँबविषयी माहिती देण्यात आलेली आहे.

शिवस्मारक बोट दुर्घटना जिथे घडली तिथला व्हिडिओ

First published: October 24, 2018, 8:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading