संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल

  • Share this:

29 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.  पाकिस्तानमधून पसरणारा दहशतवाद भारतासाठी धोकादायक आहे.  9/11 चा मास्टरमाईंड मारला गेला, मात्र 26/11 चा मास्टरमाईंड अजूनही उघडपणे फिरतोय, भारताला आव्हानं देतोय अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं. त्यांनी नेहमी प्रमाणे हिंदीतून भाषण केलं.स्वराज यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले.

अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मारला गेला, मात्र मुंबईवर झालेल्या  26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही उघडपणे फिरतोय आणि भारताला आव्हानं देतोय.  हाफिज सईद सारखा दहशतवादी आजही पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतोय. त्यावर पाकिस्तान काहीही कारवाई करत नाही असा घणाघात सुषमा स्वराज यांनी केला.

भारताने पाकिस्तानसोबत अनेकदा चर्चा सुरू केल्या, मात्र प्रत्येकवेळी पाकिस्तानच्या कुरापतींमुळेच चर्चा थांबल्या असा आरोपही सुषमा स्वराज यांनी केला.

स्वराज यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या कामाचा पाढाही वाचला.  जनधन योजनेअंतर्गत भारतात 32 कोटी 61 लाख बँक खाते उघडले गेले अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.

स्वराज यांच्या आधी, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यासोबतची बैठक रद्द करण्यात आली होती. ही बैठक काश्मीरमध्ये पोलिसांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि बुरहान वानीचे पोस्टाचे तिकीट काढण्याच्या निषेधार्थ रद्द करण्यात आली.

एवढंच नाहीतर सार्क देशांच्या बैठकीत पाकच्या परराष्ट्रमंत्री कुरैशी हजर होत्या. हे कळल्यावर सुषमा स्वराज यांनी या बैठकीतून बाहेर पडल्या होत्या.

=============================================

Exclusive: पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल' म्हणते...

First published: September 29, 2018, 8:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading