सुषमा स्वराज खोटं बोलल्या, चीनचा निर्लज्ज आरोप

सुषमा स्वराज खोटं बोलल्या, चीनचा निर्लज्ज आरोप

सुषमा खोटं बोलत होत्या, असं ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या अग्रलेखात म्हटलंय.

  • Share this:

21 जुलै : लोकसभेत काल सुषमा स्वराज यांनी चीनशी सुरू असलेल्या तणावाबाबत जी माहिती दिली ती खोटी होती, असा निर्लज्ज आरोप चीननं केलाय. सुषमा खोटं बोलत होत्या, असं ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या अग्रलेखात म्हटलंय.

ग्लोबल टाईम्स हे चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे. तिथल्या सरकारचाच हा आवाज मानला जातो. दोन्ही देशांनी एकाचवेळी सैन्य मागे घेणं हे स्वप्नरंजन आहे. चीननं खूप संयम दाखवलाय. पण दिल्लीला अद्दल घडत नसेल तर चीनला युद्ध करावं लागेल, चीनकडे दुसरा पर्याय उरणार नाही अशी वल्गनाही यात करण्यात आलीय.

First published: July 21, 2017, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading