मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार, पण स्वप्न अधुरंच राहणार?

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार, पण स्वप्न अधुरंच राहणार?

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटिश पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. आतापर्यंत झालेल्या मतदानात सुनक यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. परंतु, आता सुनक यांचं हे स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटिश पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. आतापर्यंत झालेल्या मतदानात सुनक यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. परंतु, आता सुनक यांचं हे स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटिश पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. आतापर्यंत झालेल्या मतदानात सुनक यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. परंतु, आता सुनक यांचं हे स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे.

    लंडन, 22 जुलै : सध्या ब्रिटनमध्ये (Britain) ऋषी सुनक (Rishi Sunak) जोरदार चर्चेत आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटिश पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. आतापर्यंत झालेल्या मतदानात सुनक यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. परंतु, आता सुनक यांचं हे स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे. एका नवीन सर्वेक्षणानुसार, परराष्ट्र सचिव लिझ ट्रस (Liz Truss) यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या ऋषी सुनक यांच्यावर 28 मतांची आघाडी घेतली आहे. YouGov ही ब्रिटिश आंतरराष्ट्रीय इंटरनेट आधारित मार्केट रिसर्च आणि डाटा अ‍ॅनॅलिसिस फर्म आहे. YouGov च्या सर्वेक्षणानुसार, गुरुवारी बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या (Conservative Party) सदस्यांनी ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांना मतदानाच्या (Voting) अंतिम फेरीत भाग घेतला. आता या दोघांसाठी सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत मतदान होईल. बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री (Finance Minister) राहिलेले ऋषी सुनक यांच्यासाठी पंतप्रधान होण्याचा मार्ग सोपा दिसत नाही. कारण त्यांना आता टोरी सदस्यांमध्ये अत्यंत कठीण मतदानाचा सामना करावा लागणार आहे. लिझ ट्रस यांना या पूर्वीच बोरिस जॉन्सन यांनी पाठिंबा दिला आहे. 'स्काय न्यूज'च्या वृत्तानुसार, 46 वर्षांच्या लिझ ट्रस या 42 वर्षांचे माजी चॅन्सेलर ऋषी सुनक यांना एकमेकांविरोधातल्या लढाईत 19 गुणांनी पराभूत करतील, असं या आठवड्याच्या सुरुवातीच्या आकडेवारीवरून दिसून येतं. ट्रस यांनी आपली मजबूत आघाडी कायम ठेवल्याचं टोरी सदस्यांच्या एका नवीन YouGov सर्वेक्षणातून दिसतं. (जळगावात खडसे समर्थक, नगरसेविकेच्या मुलाला महिलांकडून प्रचंड चोप, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल) बुधवारी आणि गुरुवारी करण्यात आलेल्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या 730 सदस्यांच्या सर्वेक्षणानुसार, आम्ही ट्रस यांना मतदान करू, असं 62 टक्के लोकांनी सांगितलं. तर 38 टक्के लोकांनी ऋषी सुनक यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. काहींनी या दोघांपैकी कोणालाही मतदान करणार नसल्याचं सांगितलं. ट्रस यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी 20 गुण होते, ते आता 24 पर्यंत वाढले आहेत. सध्या कॉन्झर्व्हेटिव्ह सदस्यांची संख्या अस्पष्ट आहे. 2019 मधल्या शेवटच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत सुमारे 1 लाख 60 हजार सदस्य होते. ही संख्या आता वाढली आहे, असं अतंर्गत सूत्रांना वाटतं. याचाच अर्थ मतदान करणारा पक्ष हा काही प्रतिनिधी नाही. लिझ ट्रस यांनी पुरुष आणि महिला अशा जवळपास प्रत्येक कॅटेगरीत सुनक यांना मागे टाकलं असल्याचं आकडेवारीतून दिसतं. ब्रेक्झिटसाठी (Brexit) मतदान करणाऱ्या सदस्यांचा विश्वासही ट्रस यांनी जिंकला आहे. या एकमेव गटात सुनक यांनी ट्रस यांचा पराभव केला आहे. सुनक यांच्यासमोर सर्वांत मोठं आव्हान पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या अंदाजे एक लाख 60 मतदारांनी (Voters) आपल्याला मतदान करावं, यासाठी सुनक यांना आता त्यांची मनधरणी करावी लागेल. ट्रस आणि सुनक यांच्यात सोमवारी (25 जुलै 2022) बीबीसीवर थेट डिबेट (Debate) होईल. या डिबेटकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. यानंतर पोस्टल बॅलेटवर (Postal Ballot) मतदान होईल. यूकेच्या (UK) नवीन पंतप्रधानांचं नाव 5 सप्टेंबर रोजी जगासमोर येईल. तळागाळात खूप लोकप्रिय आहेत लिझ ट्रस पुराणमतवादी मतदार आणि अनेक राजकारण्यांमध्ये लिझ ट्रस या खूप लोकप्रिय आहेत. रशिया- युक्रेन युद्धाबाबत ट्रस यांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. परराष्ट्र सचिव या नात्यानं त्यांनी पुतीन यांना या युद्धासाठी जबाबदार धरलं आहे. या भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली. तळागाळातल्या लोकांमध्ये ट्रस विशेष लोकप्रिय आहेत. पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांच्याऐवजी तुम्ही कोणालाही पाठिंबा द्या, अशी बोरिस जॉन्सन यांची आधीपासून भूमिका आहे. नेमका कसा आहे ऋषी सुनक यांचा दृष्टिकोन? ऋषी सुनक हे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. तसंच नॉर्थ यॉर्कशायर मधल्या रिचमंड (यॉर्क) मतदारसंघातून संसद सदस्य आहेत. 2015 मध्ये येथून विजयी होऊन ते खासदार झाले. 2019-2020 मध्ये ते मुख्य कोषागार सचिव होते आणि फेब्रुवारी 2020 मध्ये ते अर्थमंत्री झाले. "ही नेतृत्व स्पर्धा केवळ आमच्या पक्षाचा नेता होण्यापेक्षा अधिक आहे. ती आपल्या ब्रिटनचा संरक्षक होण्याबाबत आहे", असं सुनक यांनी या महिन्याच्या सुरुवातीला नेतृत्वासाठी उमेदवारी सादर केल्यापासून अनेक डेबिट आणि मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
    First published:

    Tags: Britain

    पुढील बातम्या