मुंबई, 5 फेब्रुवारी : जगभरातील प्रमुख दहशतवाद्यांचे (Terrorist) पाकिस्तान (Pakistan) हे आश्रयस्थान आहे, ही बाब आता सर्वांनाच माहिती आहे. ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) पाकिस्तानमध्येच लपून बसला होता. त्याला मारण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) केला होता. त्यानंतर भारतामध्ये कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी वायू सेनेनं (Air Force) पाकिस्तानातील बालाकोटमध्ये (Balakot) 2019 साली सर्जिकल स्ट्राईक केला होता. हे दोन्ही सर्जिकल स्ट्राईक जगभर गाजले. आता आणखी एका देशानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
का केला सर्जिकल स्ट्राईक?
पाकिस्तानमध्ये इराणनं (Iran) सर्जिकल स्ट्राईक केल्याची बातमी आहे. इराणच्या रेवोल्यूशनरी गार्ड्स (IRGC) यांनी पाकिस्तानात घुसून लष्करी कारवाई केली आहे. या कारवाईत त्यांनी आपल्या देशाच्या दोन सैनिकांची मुक्तता केली आहे. या सैनिकांचं 2018 साली अपहरण करण्यात आलं होतं. ‘जैश उल-अदल’ (Jaish ul-Adl) या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात हे दोन सैनिक होते, त्यांच्या मुक्ततेसाठी मंगळवारी रात्री यशस्वी ऑपरेशन करण्यात आलं अशी माहिती इराणच्या सैनिकांनी दिली आहे. इराणच्या सैन्यानं पाकिस्तामध्ये घुसून आपल्या सैनिकांना सोडवलं सुटका करण्यात आलेल्या दोन्ही सैनिकांची इराणमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
2018 साली झालं होतं अपहरण
‘जैश-उल-इदल’ या दहशतवाद्यांनी 16 ऑक्टोबर 2018 रोजी दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील मर्कवा शहरातून IRGC च्या 12 सैनिकांचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करण्यात आलेल्या सर्व सैनिकांना बलुचिस्तान प्रांतामध्ये बंदिस्त ठेवण्यात आलं होतं.
या सैनिकांच्या मुक्ततेसाठी इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एक संयुक्त समिती बनवली होती. या समितीच्या प्रयत्नामुळे 12 पैकी 5 सैनिकांची नोव्हेंबर 2018 मध्ये मुक्तता करण्यात आली. त्यानंतर 21 मार्च 2019 रोजी पाकिस्तानी सैन्यानं आणखी चार इराणी सैनिकांची मुक्तता केली होती.
‘जैश-उल-अदल’ ही एक जिहादी दहशतवादी संघटना आहे. ही संघटना प्रामुख्यानं दक्षिण-पूर्व इराणमध्ये सक्रीय आहे. इराणमधील अनेक सैनिकी ठिकाणांवर या संघटनेनं यापूर्वी हल्ला केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.