• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • आपल्या बॉसलाही मिळत नाही इतका पगार! या देशात ट्रक ड्रायव्हर कमावतो वर्षाला 72 लाख

आपल्या बॉसलाही मिळत नाही इतका पगार! या देशात ट्रक ड्रायव्हर कमावतो वर्षाला 72 लाख

आताच रवाना व्हा या देशात...

 • Share this:
  इंग्लंड, 17 सप्टेंबर : ब्रिटेनच्या सुपरमार्केटमध्ये (In a UK supermarket) ट्रक ड्रायव्हरला जितका पगार दिला जातो, तितका तर आपल्या देशात मोठ मोठ्या इंजिनिअरलादेखील मिळत नाही. आणि हो हे खरं आहे. तेथील एका सुपरमार्केटमध्ये साहित्य डिलिव्हरी करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला 70,000 पाऊंड म्हणजे तब्बल 70,88,515 रुपयांचा वार्षिक पगार (The annual salary of a truck driver is Rs 70,88,515) दिला जातो. इतकच नाही तर 2000 पाऊंड म्हणजे साधारण 2,02,612 रुपयांचा बोनस दिला जातो. टेस्को आणि सेन्सबरी सारख्या कंपन्यांचे रिक्रूटर्स ट्रक ड्रायव्हरला चांगला पगार ऑफर करतात. कारण तेथे राष्ट्रीय स्तरावर 1,00,00 ड्रायव्हरांची कमतरता आहे. अशा व्यवसायात अनुभवी लोकांना सुपरमार्केटमध्ये स्टॉक ठेवण्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी लाखो रुपयांच्या वेतनाचे आमीष दिलं जातं. (Supermarket Truck drivers in UK earn Rs 72 lakh a per year) हे ही वाचा-भयंकर! एअरपोर्टच्या बाथरूममध्येच प्रसुती; तोंडात टॉयलेट पेपर कोंबुन बाळाची हत्या 17 वर्षांपासून ट्रक चालवणारे बेरी नावाच्या ट्रक ड्रायव्हरने दावा केला आहे की, त्याला एजंटनी 2000 पाऊंड बोनससह 2 वर्षांचा करार स्वीकारण्यासाठी संपर्क केला होता. बीबीसी लाइव्हशी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांना एका आठवड्यात पाच दिवस रात्रीची शिफ्ट दिली होती. ज्यात शनिवारसाठी दीडपट आँ रविवारसाठी दुप्पट पैसे दिले जाणार होते. ते म्हणाले की या उद्योगात वेतनाचा आकडा पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. एका ट्रक ड्रायव्हरने सांगितलं की, माझे बॉसदेखील इतकं कमावत नाहीत. ते सुट्टीच्या दिवशी सुपरमार्केटमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी ड्रायव्हरचा शोध घेत आहेत. बेरी पुढे म्हणाला की, ज्या अज्ञात एजन्सीने त्यांना नोकरीची ऑफर दिली होती. त्यापैकी सेन्सबरी आणि टेस्को यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात टेस्को कंपनी जर सप्टेंबरच्या आधी कंपनीत सामील झाला तर लॉरी ड्रायव्हरला 1000 यूरो बोनस देत होतो.
  Published by:Meenal Gangurde
  First published: