पाकमध्ये दुहेरी बाॅम्बस्फोटात 15 ठार

पाकमध्ये दुहेरी बाॅम्बस्फोटात 15 ठार

क्वेटा शहरात झालेल्या स्फोटानंतर उत्तर पश्चिम पाकिस्तानातील परचिनार शहरात झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात १५ जण ठार तर ७० हून अधिक जखमी झाले आहेत.

  • Share this:

23 जून : दिवसभरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तान हादरलंय. क्वेटा शहरात झालेल्या स्फोटानंतर उत्तर पश्चिम पाकिस्तानातील परचिनार शहरात झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात १५ जण ठार तर ७० हून अधिक जखमी झाले आहेत.

सकाळी क्वेटा शहरात झालेल्या स्फोटात ११ जण ठार झाले होते. दोन्ही स्फोट हे तीन मिनिटांच्या अंतराने एका बाजारपेठेत झाले. ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा लोक इफ्तारसाठी सामान खरेदी करत होते.

त्यापूर्वी क्वेटा शहरात सकाळी पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाजवळ झालेल्या स्फोटात सुमारे ११ जण ठार तर २० हून अधिक जखमी झाले होते. मृतांमध्ये ३ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हा स्फोट सकाळी ९ च्या सुमारास बलुचिस्तान प्रांतात गुलिस्तार रस्त्यावरील पोलीस महानिरीक्षक एहसान महबूब यांच्या कार्यालयाजवळ झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading