कराची 27 एप्रिल : पाकिस्तानातील कराची विद्यापीठ परिसरात मंगळवारी (26 एप्रिल 22) दुपारी मोठा स्फोट (Blast near Karachi University) झाला. या स्फोटामध्ये 3 चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला व्हॅनमध्ये स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता, मात्र काही काळानंतर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ (Karachi University Blast CCTV video) समोर आला. यामुळे हा हल्ला एका आत्मघातकी हल्लेखोर महिलेने (Female Suicide Bomber) केल्याचे स्पष्ट झाले. आता या महिलेच्या पतीने त्याला आपल्या पत्नीवर गर्व असल्याचे ट्विट (Suicide Bomber husband tweet) केले आहे. यासोबतच आपल्या दोन्ही मुलांनादेखील तुझा अभिमान वाटेल, असंही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Karachi Bomb Blast मागे महिलेचा हात; आत्मघातकी हल्ला करणाऱ्या बाईचा VIDEO आला समोर
उच्चशिक्षित होती दहशतवादी महिला
या हल्ल्यानंतर बलूच लिबरेशन आर्मीने (Baloch Liberation Army) याची जबाबदारी घेतली. त्यासोबतच त्यांनी हल्लेखोर महिलेबाबत बरीच माहिती देखील जाहीर केली. बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) या महिलेला आपली पहिली महिला ‘फिदायी’ (First female Fidayee) म्हटलं आहे. त्यांनी जाहीर केलेल्या स्टेटमेंटनुसार, या हल्लेखोर महिलेचं नाव शारी बलूच (Shari Baloch) असं होतं. 30 वर्षांची शारी ही नझर अबाद तुर्बत भागातील रहिवासी होती. शारी उच्चशिक्षित होती, तिने झूलॉजीमध्ये मास्टर्स केलं होतं. यासोबतच तिचा एम फिलचा (MPhil) अभ्यास सुरू होता. यासोबतच ती एका माध्यमिक विद्यालयात विज्ञान विषय शिकवत होती. “विद्यार्थी असताना शारी ‘बलूच विद्यार्थी संघटने’ची सदस्य होती. बलूच नरसंहार आणि बलुचिस्तानचा ताबा या घटनांची तिला जाणीव होती,” असंही बलूच लिबरेशन आर्मीच्या स्टेटमेंटमध्ये (BLA Statement) म्हटलं आहे.
Shari Jan,your selfless act has left me speechless but I am also beaming with pride today. Mahroch and Meer Hassan will grow into very proud humans thinking what a great woman their mother https://t.co/xOmoIiBPEf will continue to remain an important part of our lives. pic.twitter.com/Gdh2vYXw7J
— Habitan Bashir Baloch (@HabitanB) April 26, 2022
नवऱ्याला वाटतो अभिमान
अफगाणिस्तानातील पत्रकार बशीर अहमद ग्वाख (Journalist Bashir Ahmad Gwakh) यांनी या महिलेच्या पतीचं ट्विट (Shari Bashir Husband tweet) सर्वांसमोर आणलं आहे. या महिलेचे वडील सरकारी कर्मचारी होते, तर पती एक डेंटिस्ट आहे. या घटनेनंतर तिच्या पतीने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. “शारी जान, तुझ्या या निःस्वार्थ कृत्यामुळे मी निशब्द झालो आहे. मात्र, मला तुझा अतिशय अभिमान वाटतो आहे. माहरोच आणि मीर हसन या दोघांनाही तुझ्याबद्दल गर्व वाटतो. तू कायमच आमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राहशील.” अशा आशयाचे ट्विट हबितान बशीर बलूच (Habitan Bashir Baloch) याने केलं होतं. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Russia Ukraine War: रशियाची मोठी खेळी, अमेरिका- ब्रिटेनकडून युक्रेनला मिळालेली मदत केली उद्धवस्त
या ट्विटसोबत त्याने त्याच्या कुटुंबाचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. यामध्ये हबितान, शारी, त्यांची आठ वर्षांची मुलगी माहरोश आणि चार वर्षांचा मुलगा मीर हसन हे दिसत आहेत. उच्चशिक्षित आणि कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसलेल्या एखाद्या कुटुंबातून अशा प्रकारचा हल्ला, आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया येणे हे बलुचिस्तानमधील युवा पिढीबाबत बरंच काही सांगून जातं, असं मत पत्रकार बशीर अहमद ग्वाख यांनी आपल्या ट्विट्समधून व्यक्त केलं आहे.
बशीर यांच्या ट्विटमधील माहितीनुसार, शारी दोन वर्षांपूर्वी बलूच लिबरेशन आर्मीमध्ये सहभागी झाली होती. तसंच तिने या आत्मघातकी हल्ल्यासाठी स्वतःचं पुढाकार घेतला होता. दरम्यान, एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्याच्या 10 तासांपूर्वी शारीने आपल्या ट्विटरवरून गूडबाय मेसेज पोस्ट केला होता. उच्चशिक्षित अशा शारीने हे पाऊल कसं उचललं याबाबत प्रसिद्धी माध्यमांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, Pakistan, Terrorist attack