मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Suaz Canal मध्ये अडकलेल्या जहाजातील भारतीय क्रू मेंबर्स बळीचा बकरा ठरणार?

Suaz Canal मध्ये अडकलेल्या जहाजातील भारतीय क्रू मेंबर्स बळीचा बकरा ठरणार?

गेल्या काही दिवसांपासून इजिप्तमधील (Egypt) सुवेझ कालव्यात (Suez Canal) अडकलेले एव्हर गिव्हेन (Ever Given) हे महाकाय मालवाहतूक जहाज (Ship) आता मोकळं झाल्यानं जगाची मोठी चिंता दूर झाली आहे, पण असं असलं तरी भारतासमोरची (India) अडचण मात्र वाढली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 मार्च : गेल्या काही दिवसांपासून इजिप्तमधील (Egypt) सुवेझ कालव्यात (Suez Canal) अडकलेले एव्हर गिव्हेन (Ever Given) हे महाकाय मालवाहतूक जहाज (Ship) आता मोकळं झाल्यानं जगाची मोठी चिंता दूर झाली आहे, पण असं असलं तरी भारतासमोरची (India) अडचण मात्र वाढली आहे. या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांवर सुवेझ कालवा प्राधिकरण (Suez Canal Authority) कारवाई करण्याची शक्यता आहे. या अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत या 25 कर्मचाऱ्यांना नजरकैदेत ठेवलं जाण्याची शक्यता आहे. याबाबतीतील कायदेशीर प्रक्रियेबद्दल जहाज व्यवस्थापन कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र जहाज उद्योगातील एका तज्ज्ञांच्या मते, जहाजावरील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा केलं जाऊ शकतं.

राष्ट्रीय शिपिंग बोर्डचे (National Shipping Board) सदस्य कॅप्टन संजय नहार यांच्या मते, सर्वांत आधी हे जहाज अडकलं कसं? याचा शोध घ्यावा लागेल. जहाजातील डेटा रेकॉर्डरमधील संभाषणाचा तपास केल्यावर याचा उलगडा होऊ शकेल. अपघातामागचे कारण सापडू शकेल.

सुवेझ कालव्यातील मार्ग मोकळा

सुवेझ कालव्यात 23 मार्चपासून अडकलेले हे महाकाय जहाज निघाल्यानं आता हा मार्ग मोकळा झाला आहे. या घटनेमुळे अनेक मालवाहतूक जहाजं इथं अडकून पडली होती. त्यामुळे दर दिवशी अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होत होतं. हे एव्हर गिव्हेन जहाज मुक्त करण्यासाठी बोस्कालिस कंपनीची मदत घेण्यात आली. टग बोटींचा वापर करण्यात आला. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर बर्डोस्की म्हणाले की, आमच्या तज्ज्ञांनी सुवेझ कालवा प्राधिकरणाच्या सहकार्यानं हे अडकलेलं जहाज पुन्हा जलमार्गात आणण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे इथली वाहतूक आता सुरळीत होऊ शकेल.

समुद्रात वाहतूक कोंडी

सुवेझ कालवा प्राधिकरणाचे(SCA)प्रमुख लेफ्टनंट जनरल ओसामा रबेई यांनी सांगितलं की, सुवेझ कालव्यातील वाहतूक स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी सहा वाजता पूर्ववत सुरू झाली. सर्वांत आधी प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या जहाजांना सोडण्यात आलं. मंगळवार सकाळपर्यंत 420 पैकी 113 जहाजांना सोडलं जाईल. इथे अडकून पडलेली सर्व जहाजे लाल सागराकडे रवाना होण्यासाठी आणखी दहा दिवस लागण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एव्हर गिव्हेन हे जगातील सर्वांत विशाल कंटेनर जहाजांपैकी एक आहे. पनामाचे हे जहाज आशिया आणि युरोप दरम्यान मालवाहतूक करते. आफ्रिकेला सिनाई बेटापासून विभक्त करणाऱ्या सुवेझ कालव्यात हे जहाज आठवड्यापूर्वी अडकलं होतं.

First published: