सुदान : सिरॅमिक कारखान्यात भीषण स्फोट; 18 भारतीयांसह 23 ठार

सुदान : सिरॅमिक कारखान्यात भीषण स्फोट; 18 भारतीयांसह 23 ठार

सुदानच्या या कारखान्यात अनेक भारतीय कामगार कार्यरत होते. भारतीय दूतावासाने या घटनेची नोंद घेतली आहे.

  • Share this:

खार्टुम (सुदान), 4 डिसेंबर : सिरॅमिक फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात सुदानमध्ये 23 जण ठार झाले आहेत. यामध्ये 18 भारतीयांचा समावेश आहे. 130 हून अधिक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. LPG टँकरचा स्फोट झाल्याने हा भीषण अपघात घडला. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, 16 भारतीय अजूनही बेपत्ता आहेत.

सुदानची राजधानी खार्टुम इथे सलूमी सिरॅमिक फॅक्टरी आहे. खार्टुमच्या बाहरी भागात हा सिरॅमिक कारखाना आहे. तिथे हा अपघात झाला. या कारखान्यात बहुतांश भारतीय कामाला होते. त्यामुळे मृतांमध्ये आणि जखमींमध्येही भारतीयांचा समावेश आहे.

सुदान सरकारने दिलेल्या अधिकृत आकड्यानुसार 123 जण या स्फोटात ठार झाले आहेत. हा स्फोट कसा झाला याचा तपास सुरू आहे, असं सरकारी यंत्रणांनी सांगितलं. पण या कारखान्यात ज्वालाग्रही पदार्थ अवैधरीत्या साठवून ठेवलेले होते. त्यामुळे आग भडकली आणि स्फोटाची तीव्रता वाढली, असं सरकारचं म्हणणं आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून दुःख व्यक्त केलं आहे. मृतांमध्ये काही भारतीय कामगारांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

----------------------

अन्य बातम्या

कांदा झाला शंभरी पार, पण इथं मिळतोय अजूनही सर्वात स्वस्त!

अमृता फडणवीस सरकारी बैठकांना राहायच्या उपस्थित? भाजपने केला खुलासा

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, हे डॉक्युमेंट्स दिले नाहीत तर कापला जाणार पगार

धक्कादायक! औषध प्रिस्क्राइब करावं म्हणून डॉक्टरांना 'स्त्रियांची' लाच

First published: December 4, 2019, 6:32 PM IST
Tags: sudan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading