Home /News /videsh /

नशेच्या अवस्थेत महिलेकडून झाली मोठी चूक; आता पश्चाताप करण्याची आलीये वेळ

नशेच्या अवस्थेत महिलेकडून झाली मोठी चूक; आता पश्चाताप करण्याची आलीये वेळ

दारूच्या नशेत अनेकांकडून चूका होता. मात्र या महिलेने केलेली चूक महागात पडली आहे.

    नवी दिल्ली, 17 जानेवारी : चांगले मित्र (Friendship) सुख-दु:खात आपल्या सोबत असतात. आयुष्यातील अवघड वळणांवर त्यांचं महत्त्व अधिक वाढतं. मात्र अशा मित्र वा मैत्रिणीने दगा दिला तर तो आयुष्यातील अत्यंत वाईट क्षण मानला जातो. एका महिलेने दारूच्या नशेत आपल्या मैत्रिणीला धोका दिला. ज्यासाठी ती कदाचित कधीच तिला माफ करू शकणार नाही. (Such a mistake made by a woman in a state of intoxication now forced to live with regret) बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत ठेवले शरीर संबंध.. 'डेली स्टार'मधील वृत्तानुसार, महिलेने स्वत: ही बाब शेअर करीत दु:ख व्यक्त केलं आहे. तिने सांगितलं की, माझी मैत्रिण आयुष्यातील प्रत्येक चढ-उताराच्या वेळी माझ्यासोबत होती. मात्र मी तिच्या पतीसोबत शरीरसंबंध ठेवून तिला धोका दिला. हे सर्व नशेच्या अवस्थेत झालं. ज्यामुळे मला खूप जास्त लाज वाटतेय. महिलेने सांगितलं की, तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, मात्र हे सर्व माझ्या मुर्खपणामुळं झालं. ती पुढे म्हणाली की, 10 वर्षांपूर्वी मी माझ्या पार्टनरपासून वेगळी झाले. तो माझ्यावर हुकूम चालवित होता आणि मला वाईट वागणूक देत होता. यादरम्यान माझ्या मैत्रिणीने मला खूप साथ दिली. तिच्याच मदतीमुळे मी या संकटातून बाहेर येऊ शकले. या महिलेचं वय 37 वर्षे आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं... त्या रात्रीबद्दल महिलेने सांगितलं की, आम्ही सर्वजण आपल्या बेस्ट फ्रेंडच्या घरी एका पार्टीसाठी जमा झाले होते. त्या दिवशी एका मित्राचा साखरपुडा होता. त्या रात्री आम्ही खूप धमाल केली. सर्वजण खूप प्यायले होते. त्यावेळी मी माझ्या मैत्रिणीचे पती आम्ही दोघेच राहिलो. हे ही वाचा-मार्कांच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी, प्राध्यापकाला 2 वर्षांची शिक्षा महिलेने सांगितलं की, माझ्या मैत्रिणीचं वय 37 वर्षे आहे. तर तिचा पती 38 वर्षांचा. त्या रात्री शेवटपर्यंत आम्ही दोघेच दारू पित बसलो होतो. मात्र त्यावेळी मैत्रिणीच्या पतीने हात पकडून मला स्वत:कडे खेचून घेतलं. त्यानंतर त्याने मला किस केलं, ज्यामुळे मी हैराण झाले. यानंतर तो मैत्रिणीला वरच्या खोलीत घेऊन गेला. येथे दोघेही खूप जवळ आले. तो क्षण आम्ही दोघेही जगलो. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी खळबळ उडाली होती. महिलेने सांगितलं की, त्या दिवशी मी झोपेतून जागी झाले तेव्हा खूप आजारी असल्या सारखं वाटत होतं. मला रात्री आपण केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत होता. जर आपल्या मैत्रिणीला याबद्दल कळालं, तर काय होईल या विचाराने महिलेला झोप लागत नाही. महिलेने सांगितलं की, त्या रात्रीनंतर मी परत कधीच मैत्रिणीच्या नवऱ्याशी बोलले नाही. ती एक चूक होती हे आम्हाला दोघांनाही मान्य आहे. मात्र जेव्हा याचा खुलासा होईल, तेव्हा काय परिस्थिती असेल असा विचार करून महिलेला तिच्या कामातही नीट लक्ष घालता येत नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Friendship, Wife and husband

    पुढील बातम्या