मराठी बातम्या /बातम्या /विदेश /NASA: पर्सिव्हरन्स रोवर मंगळावर पोहोचलं, अनेक प्रश्नांची मिळणार उत्तरं

NASA: पर्सिव्हरन्स रोवर मंगळावर पोहोचलं, अनेक प्रश्नांची मिळणार उत्तरं

असं म्हटलं जातं, की जेजेरो क्रेटरमध्ये आधी नदी वाहायची. याच पार्श्वभूमीवर तिथे कधी जीवसृष्टी होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करणार आहेत.

असं म्हटलं जातं, की जेजेरो क्रेटरमध्ये आधी नदी वाहायची. याच पार्श्वभूमीवर तिथे कधी जीवसृष्टी होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करणार आहेत.

असं म्हटलं जातं, की जेजेरो क्रेटरमध्ये आधी नदी वाहायची. याच पार्श्वभूमीवर तिथे कधी जीवसृष्टी होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करणार आहेत.

वॉशिंग्टन 19 फेब्रुवारी : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ला (NASA) मंगळवार ‘पर्सिव्हरन्स’ (Perseverance Rover) रोवरचे यशस्वीरित्या लँडिंग करण्यात यश मिळालं आहे. अमेरिकेनं रात्री 2 वाजून 30 मिनीटांच्या दरम्यान पर्सिव्हरन्स मंगळावर उतरवलं. सात महिन्यांपूर्वी पाठवण्यात आलेलं सहा पायांचं हे रोवर मंगळावर उतरुन त्याठिकाणची विविध माहिती गोळा करेल. सोबतच मंगळावर कधी जीवसृष्टी होती का, याचा तपासही करणार आहे. हे रोव्हर २९.५५ कोटी मैलचे अंतर कापून मंगळावर दाखल झाले आहे.

जेजेरो क्रेटर (Jezero Crater) मंगळ ग्रहावरील अत्यंत दुर्गम भाग आहे. याठिकाणी खोल घाट आणि अतिशय उंच डोंगर आहेत. यासोबतच इथे असणारे मोठमोठे दगड याला आणखीच भयंकर बनवतात. यामुळे पर्सिव्हरन्स रोवर लँडिंगकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मंगळावर सर्वाधिक रोवर पाठवणारा अमेरिका जगभरातील पहिला देश ठरला आहे. असं म्हटलं जातं, की जेजेरो क्रेटरमध्ये आधी नदी वाहायची. याच पार्श्वभूमीवर तिथे कधी जीवसृष्टी होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करणार आहेत. पर्सिव्हरन्स रोव्हरमध्ये २३ कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यातून आवाज आणि व्हिडिओ रेकोर्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन मायक्रोफोन्सही लावण्यात आले आहेत.

वैज्ञानिकांच्या मते, मंगळ ग्रहावर कुठला जीव राहातही असेल तर तो जवळपास तीन ते चार अरब वर्षांपूर्वी. जेव्हा ग्रहावर पाणी उपलब्ध होतं. वैज्ञानिकांना आशा आहे, की या रोव्हरच्या मदतीनं अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यास मदत होईल. पर्सिव्हरन्स  नासाद्वारे पाठवलं गेलेलं आतापर्यंतच नववं रोवर आहे. वैज्ञानिकांना सांगितलं, की रोवरला मंगळावर उतरवताना शेवटच्या सात मिनीटांचा वेळ श्वास रोखून धरणारा होता. रोवरनं यशस्वरित्या लँडिंग केल्यानं वैज्ञानिकांना प्रचंड आनंद झाला.

First published:
top videos

    Tags: Nasa