S M L

फ्लोरिडामध्ये आलंय अॅल्बर्टो चक्रीवादळ, जनजीवन विस्कळीत

जॉर्जिया, साऊथ कॅरोलिना आणि अॅलबामा भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सुदैवानं, फ्लोरिडामध्ये जीवितहानी झालेली नाही.

Sonali Deshpande | Updated On: May 29, 2018 11:48 AM IST

फ्लोरिडामध्ये आलंय अॅल्बर्टो चक्रीवादळ, जनजीवन विस्कळीत

फ्लोरिडा, 29 मे : अमेरिकेच्या काही भागांमध्ये चक्रीवादळ आलंय. फ्लोरिडामध्ये अॅल्बर्टो नावाचं चक्रीवादळ आलंय. जॉर्जिया, साऊथ कॅरोलिना आणि अॅलबामा भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सुदैवानं, फ्लोरिडामध्ये जीवितहानी झालेली नाही. पण जनजीवन मात्र विस्कळीत झालंय. काही ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळलीयेत.

तर अमेरिकेतल्या मेरीलँड राज्यात पुरानं थैमान घातलंय. सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरी एक नागरिक मात्र कालपासून बेपत्ता आहे. संपूर्ण यंत्रणा त्याला शोधण्याचे अथक प्रयत्न करतेय. अनेक घरं, दुकानं, कार्यालयं आणि गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. एलिकॉट सिटी भागाला पुराचा सर्वात जास्त फटका बसलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2018 11:48 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close