बालवाडीतल्या मुलाने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी अन् 'तो' देवदूतासारखा धावून आला

बालवाडीतल्या मुलाने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी अन् 'तो' देवदूतासारखा धावून आला

बालवाडीतील विद्यार्थ्याने आपल्या शाळेच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली. पण तो देवदूतासारखा धावून आल्यामुळे चिमुरड्याचे प्राण वाचले आहेत.

  • Share this:

झिनहे, 04 नोव्हेंबर:  चीनमधील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. झिनहे या शहरातील एका बालवाडीतील विद्यार्थ्याने आपल्या शाळेच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी? तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन सुद्धा चमत्कारिकपणे त्याचा जीव वाचला. त्याच्या खाली उभा असलेल्या सिक्युरिटी गार्डने त्याला उडी मारल्यानंतर आपल्या हातात झेलून त्याचा जीव वाचवला.

गार्डने मुलाचे प्राण वाचवले असले, तरी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्यामुळे मुलाला किरकोळ फ्रॅक्चर झाले आहेत. मुलाने उडी मारतानाचं आणि गार्डने त्याला पकडल्याचं फुटेज इंटरनेटवर व्हायरल झालं आहे. ही घटना चीनमधील झिनहे गावातली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार फी काउंटी एज्युकेशन ब्युरोच्या म्हणण्यानुसार, मुलाची अद्यापही ओळख पटली नाही, तो बाथरूममध्येच कोंडून राहिला होता. आपली सुटका करण्यासाठी त्याने बाथरूमची खिडकी उघडली आणि रेलिंगवरुन झेप घेतली. गुड मॉर्निंग शेडोंग या चिनी माध्यमांनी ही क्लिप प्रसिद्ध केली आहे. व्हिडिओमध्ये, लोक ओरडताना आणि मुलाला उडी न मारण्यास सांगत होते.

प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात असेही म्हणण्यात आले आहे की मुलाने बाथरूमची खिडकी उघडली होती आणि तो रेलिंगवर चढला होता. शिक्षकांनी त्यांना उडी मारण्यापासून थांबवायचे प्रयत्न केले तरीही मुलाने हा उपाय निवडला. त्यानंतर मुलाला इस्पितळात नेले गेले. यापूर्वी, सप्टेंबरमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाने पाचव्या मजल्यावरून उडी मारली होती. चीनच्या वुहानमधील शाळेत त्याच्या आईने त्याला शाळेत थोबाडीत मारल्यामुळे एका मुलाने पाचव्या मजल्यावरून उडी मारली होती. माध्यमांतील बातम्यांनुसार शाळेच्या मुख्याध्यापकाने काही चुकीसाठी फटकारण्यासाठी नववीच्या या विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावले होते. मिटींगनंतर बाहेर पडल्यावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलाच्या आईने दोन वेळा मुलाला कानाखाली मारल्याचे उघड झाले होते. त्याची आई गेल्यानंतर मुलाने पाचव्या मजल्यावर जाऊन उडी मारली.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 4, 2020, 5:33 PM IST

ताज्या बातम्या