• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • फोटो पाहून केली घाणेरडी कमेंट, वाचून महिलेला कोसळलं रडू; केली complaint

फोटो पाहून केली घाणेरडी कमेंट, वाचून महिलेला कोसळलं रडू; केली complaint

ऑनलाईन ओळख झालेल्या (Stranger give rape threat on instagram) एका व्यक्तीने महिलेच्या कपड्यांबाबत अशी काही कमेंट केली की महिलेला थेट रडूच कोसळलं.

 • Share this:
  स्कॉटलंड, 5 नोव्हेंबर: ऑनलाईन ओळख झालेल्या (Stranger give rape threat on instagram) एका व्यक्तीने महिलेच्या कपड्यांबाबत अशी काही कमेंट केली की महिलेला थेट रडूच कोसळलं. महिलेनं सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो पाहून तिच्या ऑनलाईन (Online friend commented on photo) मित्रानं त्यावर एक कमेंट केली. ती कमेंट केवळ अश्लीलच नव्हे, तर गुन्हेगारी स्वरुपाची होती. ती कमेंट वाचून महिलेसह अनेकांना धक्का बसला. काय आहे प्रकरण? स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या बेका मॅकफर्लेन नावाच्या 27 वर्षांच्या तरुणीला भयंकर अनुभव आला. काही दिवसांपूर्वीच तिची ओळख इस्ट्राग्रामवरील एका तरुणाशी झाली होती. प्रत्यक्ष न भेटताही त्यांचे ऑनलाईन सूर जुळले होते आणि ते अनेकदा एकमेकांशी गप्पा मारत होते. काही दिवसांपूर्वीच या ऑनलाईन मित्राने बेकाला ड्रिंक्ससाठी भेटण्याची विनंती केली होती. ही विनंती तिने मान्यही केली होती. लवकरच ते दोघं एकमेकांना प्रत्यक्ष भेटणार होते. भेटीपूर्वीच दिसले रंग ही भेट होण्यापूर्वी काही दिवस अगोदर बेकानं तिचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला. त्या फोटोवर अनेक नेटिझन्सन कमेंट केल्या. मात्र तिच्या ऑनलाईन मित्रानं केलेली कमेंट वाचून तिला जबर धक्का बसला. फोटोत दिसणाऱ्या या कपड्यांत जर तू समोर आलीस, तर मी तुझ्यावर बलात्कारच करेन, अशी ती कमेंट होती. ही कमेंट वाचून बेकाला धक्का बसला. हे वाचा- हॉस्पिटलमधून बाळाची चोरी, अर्भकाच्या जागी ठेवली प्लॅस्टिकची बाहुली दिवसभर ढाळले अश्रू ही कमेंट वाचल्यानंतरचे आपले अनुभव बेकाने शेअर केले आहेत. ही कमेंट वाचून आपल्याला रडू कोसळलं आणि भीती वाटली, असं ती म्हणाली. ही कमेंट वाचून ती दिवसभर रडत होती. या प्रकरणाची तक्रारही तिने पोलिसांत केली असून ऑनलाईन मित्राला ब्लॉक केलं आहे. आपण त्याला प्रत्यक्ष भेटण्याआधीच त्याचे विचार समजले, हे बरंच झालं, असंही तिनं म्हटलं आहे. ऑनलाईन मैत्री करताना सावध राहण्याचा सल्ला तिने इतर महिलांना दिला आहे.
  Published by:desk news
  First published: