मुंबई, 17 जानेवारी: भारताप्रमाणे वाहतुकीचे जे नियम (Traffic Rules) आहेत, ते आणि तसेच जगभरात (All over the world) असतील, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकत आहात. जगात असे अनेक देश (Various countries) आहेत जिथले कायदे विचित्र आहेत. ज्या गोष्टी भारतात बेकायदेशीर मानल्या जातात, त्या काही ठिकाणी कायदेशीर आहेत. जाणून घेऊया, जगभरातले चित्रविचित्र वाहतुकीचे नियमकोस्टा रिका - ड्रिंक अँड ड्राईव्हभारतातसह जगातील अनेक देशांमध्ये मद्यपान करून गाडी चालवण्यास मनाई आहे. अशा प्रकरणांमध्ये भलामोठा दंड आकारला जातो आणि काही ठिकाणी वारंवार हा गुन्हा केल्यास ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होतं. मात्र कोस्टा रिकामध्ये दारु पिऊन गाडी चालवायला काहीच हरकत नाही. दारू पिऊन गाडी चालवणं हा या देशाच्या कायद्यात गुन्हाच नाही. त्यामुळे कुणीही राजरोसपणे इथं मद्यपान करून गाडी चालवू शकतं. दक्षिण अफ्रिका - जंगल कायदादक्षिण अफ्रिका हा मोठ्या प्रमाणात वन्यजीव असणारा देश आहे. या देेशातील मोठा भूभाग जंगलांनी आणि अभयारण्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे इथले वाहतुकीचे कायदेही प्राण्यांना डोळ्यांसमोर ठेऊन तयार करण्यात आले आहेत. इथल्या कायद्यानुसार रस्त्याने वाहन चालवताना वाटेत एखादा प्राणी आला, तर चालकाने जागच्या जागी गाडी थांबवणं बंधनकारक आहे. तो प्राणी रस्त्यातून बाजूला जायला जितका वेळ लावेल, तितका वेळ वाहन त्याच जागी थांबवणं बंधनकारक आहे. हा नियम मोडल्यास भलामोठा दंड आकारला जातो. जर्मनी - No STOPजर्मनीत Autobanh नावाचा एक मार्ग आहे. या मार्गावर प्रचंड वेगाने कार चालवण्यास परवानगी आहे. कुणीही कितीही वेगानं या मार्गावरून जाऊ शकतं. वेगाचं कुठलंच बंधन या रस्त्यावर घालण्यात आलेलं नाही. त्यामुळे या रस्त्यावर थांबण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे. या रस्त्यावरून तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर मध्ये कुठंही थांबता येणार नाही. अपरिहार्य कारण सोडून इतर कारणांसाठी तुम्ही थांबलात, तर दंड झालाच म्हणून समजा. स्वीडन - लाईट ऑनरात्रीची वेळ असो वा दिवसाची. स्वीडनमध्ये कार चालवताना त्याची हेडलाईट सुरू असणं बंधनकारकच आहे. अनेक युरोपीय देशांत हा नियम करण्यात आला आहे, ज्याचं कारण कुणालाच माहित नाही. सायप्रस - खाण्यााचा विचारही नकोसायप्रस देशात ड्रायव्हिंग आणि खाणं यांचा छत्तीसचा आकडा आहे. ड्रायव्हिंग करताना काहीही खाणं किंवा पिणं हा गुन्हा आहे. हा नियम इतका कडक आहे की पार्क केलेल्या कारमध्ये बसूनही तुम्ही काही खाऊ शकत नाही. युके - पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी, दंडाची पावतीरस्त्यात पावसाचं पाणी साठलं असेल तर अनेकदा फूटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ते उडतं. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारमुळे अनेकदा हा अनुभव आपण घेतो. मात्र युकेत याच्याविरोधात कायदा करण्यात आला आहे. जर एखाद्या गाडीमुळे रस्त्यावरील पाणी पादचाऱ्याच्या अंगावर उडालं तर तब्बल 5000 पाउंडचा दंड घेतला जातो. भारतीय चलनात ही रक्कम होते 5 लाख 7 हजार रुपये.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.