इंडोनेशियातले 'हे' अजब लग्न

इंडोनेशियातले 'हे' अजब लग्न

15 वर्षांच्या मुलानं 73 वर्षाच्या महिलेसोबत लग्न केलंय.

  • Share this:

09 जुलै: इंडोनेशियामध्ये अजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आलीय.एका 15 वर्षांच्या मुलानं 73 वर्षाच्या महिलेसोबत लग्न केलंय.

इंडोनेशियामधील सुमात्रा इथल्या 15 वर्षांच्या सेलामत रियादीला मलेरिया झाला होता. तेव्हा शेजारी राहणाऱ्या रोहाया बिनती मोहम्मद जकफर यांनी यावेळी त्याची काळजी घेतली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनी लग्नाचा विचार केला. मात्र वयाची अट असल्यानं त्यांना गावकऱ्यांकडून विरोध झाला होता.त्या दोघांनी लग्न न करुन दिल्यास आत्महत्या करणार अशी धमकी दिल्यानंतर गावाच्या प्रशासनाने या दोघांच्या लग्नासाठी मंजुरी दिली.

रोहायाचं हे तिसरं लग्न आहे तर सेलामतचं हे पहिलंच लग्न आहे.विशेष म्हणजे इन्डोनेशियात लग्नाचं वय 19 वर्ष आहे.त्यात सेलामतचं वयही लग्नाचं नाही म्हणून संपूर्ण देशातून या लग्नावर टीकेची झोड उठते आहे.

First published: July 9, 2017, 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading