मराठी बातम्या /बातम्या /विदेश /संध्याकाळी अंघोळीला मनाई, रात्री टीव्ही बंद! वाचा, युरोपातील घरमालकाच्या ‘पुणेरी’ अटी

संध्याकाळी अंघोळीला मनाई, रात्री टीव्ही बंद! वाचा, युरोपातील घरमालकाच्या ‘पुणेरी’ अटी

 एका घरमालकाने स्वतःचं घर भाड्याने देण्यासाठी अशा काही अटी ठेवल्या आहेत, ज्या (Strange conditions for rented house by owner) वाचून हे घर घ्यायला कुणीच तयार होत नाही.

एका घरमालकाने स्वतःचं घर भाड्याने देण्यासाठी अशा काही अटी ठेवल्या आहेत, ज्या (Strange conditions for rented house by owner) वाचून हे घर घ्यायला कुणीच तयार होत नाही.

एका घरमालकाने स्वतःचं घर भाड्याने देण्यासाठी अशा काही अटी ठेवल्या आहेत, ज्या (Strange conditions for rented house by owner) वाचून हे घर घ्यायला कुणीच तयार होत नाही.

लंडन, 18 ऑक्टोबर : एका घरमालकाने स्वतःचं घर भाड्याने देण्यासाठी अशा काही अटी ठेवल्या आहेत, ज्या (Strange conditions for rented house by owner) वाचून हे घर घ्यायला कुणीच तयार होत नाही. साधारणतः घर भाड्याने देताना (Facilities in the house) काय सुविधा आहेत, याची माहिती दिली जाते. मात्र या घरमालकाने चक्क अटी आणि शर्थींचा एक रकानाच तयार केला असून आपली एकही अट मागे घेणार नसल्याचं त्यानं म्हटलं आहे.

अशी आहे जाहीरात

लंडनमधील नॉर्थ मॅंचेस्टरमधील एका घरमालकाला आपल्या दोन खोल्या भाड्याने द्यायच्या आहेत. एक बेडरूम आणि एक किचन भाड्याने देण्यासाठी त्याने ऑनलाईन जाहीरात केली आहे. हे घर ज्याला कुणाला भाड्याने घ्यायचे असेल, तर अटींची मोठी यादी पूर्ण करावी लागणार आहे. दोन खोल्यांसाठीचं भाडं भारतीय चलनात सुमारे 97 हजार रुपये एवढं ठेवण्यात आलं आहे. या घरात राहणाऱ्या व्यक्तीला विगन डाएट फॉलो करावं लागेल. त्याला दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ घरात आणण्यास आणि तयार करण्यास मनाई करण्यात आली आहे. आपण स्वतः विगन डाएट फॉलो करत असल्यामुळे भाडेकरूनंही विगन असणं बंधनकारक असणार आहे.

अटींची जंत्री

विगन डाएटच्या मुख्य अटीशिवाय इतरही अनेक अटी आहेत. त्यानुसार टीव्ही बघण्याचा आणि गाणी ऐकण्याचा वेळ निश्चित असणार आहे. रात्री 9.30 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारचं संगीत लावता येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे रात्री 8 वाजल्यानंतर भाडेकरू घरात अंघोळ करू शकणार नाही. घरात पाहुण्यांना यायला परवानगी तर असेल, तर मात्र ते बाथरूममध्ये जाऊ शकणार नाही. याचाच अर्थ घरात येण्यापूर्वीच त्यांना बाथरूमची सोय करावी लागेल किंवा घरातून निघेपर्यंत आवर घालावा लागेल. मात्र घरातील बाथरूम कुठल्याही परिस्थिती पाहुण्यांना वापरता येणार नाही.

हे वाचा- 262 दिवसांनंतर हा देश घेणार मोकळा श्वास; 9 महिन्यांपासून होतं Lockdown

लोकांच्या प्रतिक्रिया

इतक्या जाचक अटी असलेलं घर घेणार तरी कोण, अशा अर्थाच्या प्रतिक्रिया या ऑनलाईन जाहीरातीच्या खाली वाचकांनी दिल्या आहेत. ही जाहीरात घर भाड्यानं देण्यासाठी आहे की न देण्यासाठी आहे, अशी चर्चा सध्या लंडनमध्ये रंगली आहे.

First published:
top videos

    Tags: Britain, London