स्वीडनमध्ये 'ट्रक हल्ला', 3 जणांना चिरडलं

स्वीडनमध्ये 'ट्रक हल्ला', 3 जणांना चिरडलं

स्टाॅकहोम मधील ड्रोटिंघटन स्ट्रीरवर ही घटना घडलीये

  • Share this:

07 एप्रिल :  जगातला सर्वात शांत देश म्हणून ओळख असलेल्या स्विडनमध्ये आज (शुक्रवारी) दहशतवादी हल्ला झाला. राजधानी स्टॉकहोमच्या मध्यभागी असलेल्या गजबजलेल्या रस्त्यावर भरधाव ट्रक घुसवण्यात आला. त्यात तीन जण ठार झाले तर काही नागरिक जखमी झाले.

हा ट्रक नंतर एका दुकानात घुसवण्यात आला. हा ट्रक सकाळच्या सुमारास पळवून नेण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्विडनचे पंतप्रधान स्टिफन लोफव्हेन यांनी सांगितलं.

हल्ल्यानंतर स्विडनची संसद आणि शहरातली भूमीगत मेट्रो स्टेशन्स तात्पुरती बंद करण्यात आलीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय.

मागील महिन्यात ख्रिसमसला  भरधाव ट्रकने गर्दीत घुसवला होता. या हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झाला होता.

First published: April 7, 2017, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading