सॅन फ्रान्सिस्को, 03 ऑगस्ट: जगातील बऱ्याच देशांमध्ये विविध मासिकं विकली जातात, जी जगप्रसार खूप प्रसिद्ध आहेत. यापैकी एक म्हणजे, फॉर्च्युन मॅगजीन (Fortune Magazine). फॉर्च्युन मॅगजीन हे आपल्या कव्हरसाठी ओळखले जातात. या मॅगजीनचे कव्हर नेहमीच खास असते, मात्र पहिल्यांदाच 1989 सालचे मॅगजीन चक्क 12 लाखांना विकले गेले आहे. या मॅगजीनला 12 लाखांची किंमत देण्यामागचे कारण होते एक स्वाक्षरी (autograph).
नुकत्याच या मासिकेच्या लिलावात 1989 सालचे मॅगजीन 12 लाखांना विकले गेले, कारण या मासिकेच्या कव्हर पेजवर एका महान व्यक्तीची स्वाक्षरी होती. ही व्यक्ती आहे, स्टीव्ह जॉब्स (steve jobs). या मॅगजीनच्या कव्हर पेजची विक्री नेट डे सॅंडर्सने केली होती. या लिलावात तीन लोकांनी बोली लावली होती. या लिलावात एका व्यक्तीने हे मॅगजीन 12 लाखांना विकत घेतले. या मॅगजीनच्या मूळ किंमतीपेक्षा 5000 पट जास्त किंमतीला लिलावात हे मॅगजीन विकले गेले आहे.
वाचा-केक की पैशांचं एटीएम; BIRTHDAY गिफ्टचा VIDEO पाहून तुम्हीही व्हाल सरप्राइझ
काय आहे या मॅगजीनची खासियत
या मॅगजीनच्या कव्हर पेजवर अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी स्वाक्षरी केली आहे. या मॅगजीनच्या कव्हरवर, 'To Terry, Steve Jobs', असे लिहिले आहे. ज्यावेळी स्टीव्ह जॉब्स या मॅगजीनच्या कव्हरवर झळकले जेव्हा ते नेक्स्टी सॉफ्टवेअर नावाच्या कंपनीत होते.
वाचा-2 तास काहीच न केल्याचा VIDEO केला पोस्ट; तरीही युट्यूबवर 19 लाख VIEWS
मीडिया रिपोर्टनुसार, 1980 साली टेरी नावाचा इसम स्टीव्ह जॉब्स यांचा ड्रायव्हर होता. टेरीने एकदा स्टीव्ह यांच्याकडे स्वाक्षरी मागितली होती. त्यावेळी स्टीव्ह यांनी आपल्या जवळ असलेल्या मॅगजीनवर स्वाक्षरी करून दिली. ते मॅगजीन होते फॉर्च्युन मॅगजीन. याआधी स्टीव्ह यांनी स्वाक्षरी असलेले पिक्सर अॅनिमेशन स्टुडिओच्या टॉय स्टोरीचे पोस्टर 31 हजार 250 डॉलरला विकले गेले होते.