Home /News /videsh /

VIDEO : Journalist Danish Siddiqui च्या मृत्यूनंतर तालिबानींनी जारी केलं वक्तव्य; भारतीय पत्रकारांना दिला हा सल्ला

VIDEO : Journalist Danish Siddiqui च्या मृत्यूनंतर तालिबानींनी जारी केलं वक्तव्य; भारतीय पत्रकारांना दिला हा सल्ला

तालिबानींनी सीएनएन-न्यूज18 शी बोलताना याबाबत सांगितलं आहे.

    नवी दिल्‍ली, 17 जुलै : पुलित्‍जर पुरस्‍कार विजेता पत्रकार दानिश सिद्दीकी (Journalist Danish Siddiqui) यांच्या मृत्यूनंतर (Death) तालिबानने  (Taliban) एक वक्तव्य जारी केलं आहे. तालिबानने दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे. शुक्रवारी सिद्दीकी कंधार (Kandahar) मध्ये अफगानी सुरक्षा दल (Afghan forces) आणि तालिबानिंमध्ये सुरू असलेली चकमक कव्हर करीत होते. तेव्ही त्यांची हत्या करण्यात आली. आम्हाला गोळी कशी लागली याबद्दल माहिती नाही अफगानिस्तानमध्ये भारतीय फोटो जर्नलिस्ट (Indian Photo Journalist) दानिश सिद्दीकी यांच्या निधनानंतर तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने सीएनएन-न्यूज18 ला सांगितलं की, गोळीबार झाला त्यावेळी पत्रकाराला कशी गोळी लागली आणि त्याचा कसा मृत्यू झाला याबाबत माहिती नाही. आम्हाला भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूचं दु:ख आहे. याशिवाय तालिबानींनी कव्हरेजसाठी येणाऱ्या पत्रकारांना सल्ला दिला आहे. मुजाहिद पुढे म्हणाले की, 'युद्ध क्षेत्र (war zone) मध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही पत्रकारानी आधी सूचित करावयास हवं. यामुळे त्या व्यक्तीची आम्ही योग्य ती काळजी घेऊ. पत्रकारांनी आम्हाला सूचना न देता वॉर-झोनमध्ये प्रवेश केल्याचं दु:ख आहे. रेड क्रॉसवर मृतदेह सोपवला समाचार एजन्सी रॉयटर्ससोबत काम करणारे दानिश यांचा मृतदेह रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समिनीला (ICRC) सोपविण्यात आलं आहे. दानिश सिद्दीकी यांनी करिअरची सुरुवात टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. नंतर ते फोटोग्राफीकडे वळले आणि रॉयटर्ससाठी फोटो जर्नालिस्ट म्हणून ते काम करत होते. 13 जुलैला त्यांनी कंदाहारमधून केलेलं ट्वीट शेवटचं ठरलं. रात्रभर चाललेल्या चकमकींविषयी त्यांनी लिहिलं होतं आणि फोटो, व्हिडीओही टिपले होते. 2018 मध्ये रोहिंग्य शरणार्थींबाबतच्या बातम्या आणि कव्हरेजबद्दल त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Attack, Israel, Taliban

    पुढील बातम्या