• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती; पोटाची खळगी भरण्यासाठी महिलेनं 37 हजारात केला मुलीचा सौदा

अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती; पोटाची खळगी भरण्यासाठी महिलेनं 37 हजारात केला मुलीचा सौदा

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तेथील परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी महिलांना आपली मुले विकावी लागतात, अशी स्थिती आली आहे

  • Share this:
काबूल 27 ऑक्टोबर : अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार (Taliban in Afghanistan) आल्यानंतर अनागोंदी माजली आहे. जनतेची अन्नान्न दशा झाली आहे. भूकबळींची संख्या वाढली आहे. कुठेच व्यवस्था नसल्याने महिला, मुलं, पुरूष सर्वांवरच खूप मोठं संकट ओढवलं आहे. या संकटामुळे आयुष्यात कधीही न केलेल्या गोष्टी अफगाणी नागरिकांना कराव्या लागत आहेत. अफगाणिस्तान सोडून पलायन करायला लागतंय आणि अन्न मिळवण्यासाठी पोटची मुलं विकावी लागत आहेत. काबूलमध्ये (Kabul) राहणाऱ्या एका महिलेने आपल्या इतर मुलांना खायला घालता यावे, यासाठी नवजात मुलीला 500 अमेरिकी डॉलरमध्ये विकले (Woman Sold Her Baby Girl) आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तेथील परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी महिलांना आपली मुले विकावी लागतात, अशी स्थिती आली आहे. काबुलमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलीला अवघ्या 37 हजार रुपयांमध्ये विकले आहे. या महिलेला तिच्या इतर मुलांचे पोट भरण्यासाठी नवजात मुलीला विकावे लागले. ‘डेली स्टार'ने बीबीसीच्या एका वृत्ताचा आधार घेत म्हटले आहे की, 'तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान आल्यानंतर संबंधित महिलेच्या पतीकडे कमाईचे कोणतेही साधन उरले नाही. दोन वेळेला पोटभर अन्न मिळवणेही त्यांना अवघड झाले. अशा परिस्थितीत इतर मुलांचे पोट भरण्यासाठी महिलेला तिच्या नवजात मुलीला विकावं लागलं. यामधून जे पैसे आले आहेत, त्यातून तिला व तिच्या कुटुंबाला पुढचे काही दिवस अन्न खायला मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले. 'बाळाची हत्या कशी करावी?' Google Search केल्यानं अडकला पोलिसांच्या जाळ्यात स्वतःच्या बाळाला विकणारी आई पुढे म्हणाली, 'माझी बाकीची मुलं उपाशी होती, म्हणून मला माझी मुलगी विकावी लागली. मुलीला विकावं लागल्याचं खूप दु :ख आहे. कारण ती माझ्या पोटचा गोळा होती. माझ्यावर माझी मुलगी विकण्याची वेळ आली नसती तर खूप बरे झाले असते. माझा नवरा कचरा वेचण्याचे काम करतो, पण त्यातून पैसे मिळत नाहीत. दोन वेळेचे अन्न मिळवणेही कठीण झाले आहे. आमच्या घरी ना पीठ आहे ना तेल. आमच्याकडे काहीच नाही.' 'माझ्या मुलीला माहिती नाही की तिचे भविष्य काय असेल,' असे सांगतानाच संबंधित महिला पुढे म्हणाली, 'मला माहित नाही की तिला भविष्यात आमच्याबद्दल काय वाटेल, परंतु मला हा निर्णय घ्यावा लागला. मुलगी अवघ्या काही महिन्यांची आहे. ती चालायला लागली की खरेदीदार तिला घेऊन जाईल'. दरम्यान, या मुलीला सुमारे 500 डॉलर म्हणजे जवळपास 37,509 रुपये देऊन विकत घेण्यात आले आहे. या पैशातून महिलेचे कुटुंब काही महिन्यांसाठी घरखर्च भागवू शकते. अवघ्या 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई, असा करते मुलांचा सांभाळ; पाहा PHOTOs अफगाणिस्तानमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी आपली मुले विकली आहेत किंवा विकण्यास तयार आहेत, असेही या वृत्तात म्हटले आहे. येथील सरकारी सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आजारी बालकांना उपचार मिळणेही अवघड होऊन बसले असून त्यामुळे अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानला मिळणारा आंतरराष्ट्रीय निधी (international funding) पूर्णपणे बंद झाला आहे. तालिबान सरकारला अद्याप मान्यता मिळालेली नाही. दरम्यान, अफगाणिस्तानला तातडीने मदत न पोहोचवल्यास लाखो लोकांचा मृत्यू होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्राने (United Nations) दिला आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अनागोंदी माजली आहे. देशात अन्नधान्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. आपल्या मुलांवर उपचार करण्यासाठी नागरिकांकडे पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहेत. येथील बहुतांश नागरिक प्रचंड हालअपेष्टा सहन करीत दिवस काढत आहेत.
Published by:Kiran Pharate
First published: