बॉम्बस्फोटानंतर सरकारचा मोठा निर्णय, सुरक्षेसाठी बुरखा घालण्यावर बंदी

बॉम्बस्फोटानंतर सरकारचा मोठा निर्णय, सुरक्षेसाठी बुरखा घालण्यावर बंदी

श्रीलंकेमध्ये सीरियल बॉम्बस्फोटांची जबाबदारी आयएसने घेतली होती. त्यानंतर सरकारने या नव्या कठोर बदलांची मागणी केली होती.

  • Share this:

श्रीलंका, 29 एप्रिल : श्रीलंकेमध्ये कोलंबोसह अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉम्बस्फोट होत आहेत. यावर सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलत सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. श्रीलंका सरकारने रविवारी बुरखा आणि चेहरा कपड्याने झाकण्यावर प्रतिबंद लगावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारपासून हे नवे आदेश लागू होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

श्रीलंकेमध्ये सीरियल बॉम्बस्फोटांची जबाबदारी ISISने घेतली होती. त्यानंतर सरकारने या नव्या कठोर बदलांची मागणी केली होती. अखेर त्यावर निर्णय घेत बुरखा आणि चेहऱ्यावर कपडा बांधण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाला श्रीलंकेतील जनता कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी लिहिलं की, 'संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर सोमवारपासून बंदी घालण्यात आली आहे.' श्रीलंकेच्या संसदेत काही दिवसांपूर्वीच संसदेने सुरक्षा कारणाचा उल्लेख करून बुरख्य़ावर बंदी घालण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यावर खासदार आशु मरासिंघे यांनी म्हटलं होतं की, ' 'बुरखा' हा मुसलमानांचा पारंपरिक पोशाख नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात यावी.

हेही वाचा : मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या पैशांवरून वाद, युवकाची गळा चिरून हत्या

श्रीलंकेच्या All Ceylon Jamiyyathul Ulama (ACJU) नावाच्या मौलविंच्या संघटनेनेदेखील एक आदेश जारी केला होता की,  महिलांनी बुरखा किंवा चेहरा झाकणाऱ्या कपड्यांचा वापर करू नये. या आदेशावर स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय सुरक्षेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून असा निर्णय घेणं महत्त्वाचं असल्याचं सांगण्यात आलं होतं.

एप्रिल 21 रोजी ख्रिश्चन समुदायाच्या पर्व ईस्टर उत्सवच्या प्रसंगी श्रीलंकेच्या विविध भागात चर्चला निशाणा करण्यात आलं. यावेळी एकूण 8 बॉम्बस्फोट घडले. यात तब्बल 253 नागरिकांनी प्राण गमावले, तर शेकडोजण जखमी झाले होते.

दहशतवादी संघटना आयएसआयएसने या बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली आहे. बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत नागरिकांमध्ये  भीतीचं वातावरण आहे तर सर्वत्र पोलिसांचा पाहारा ठेवण्यात आला आहे.

आगीत जळून खाक झालेल्या नॉट्रे डेम चर्चचा DRONE व्हिडिओ

First published: April 29, 2019, 8:43 AM IST

ताज्या बातम्या