मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

India-Sri Lanka : श्रीलंकेचा भारताला धक्का, मोठा करार केला रद्द!

India-Sri Lanka : श्रीलंकेचा भारताला धक्का, मोठा करार केला रद्द!

चीनच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना श्रीलंकेनं (Sri Lanka) धक्का दिला आहे. श्रीलंकेतील बंदराबाबत भारत आणि जपानशी केलेला करार श्रीलंकेनं रद्द केला आहे.

  • Published by:  News18 Desk

कोलंबो, 4 फेब्रुवारी :  चीनच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना श्रीलंकेनं (Sri Lanka) धक्का दिला आहे. श्रीलंकेनं भारत आणि जपान यांच्या मदतीनं एक पोर्ट टर्मिनल उभारण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र या मुद्यावर विरोधी पक्षांच्या आंदोलनापुढे झुकत पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) यांनी हा करार रद्द केल्याची घोषणा केली आहे.

काय होता करार?

भारत आणि जपान यांच्या मदतीनं श्रीलंकेनं इस्ट कंटेनर टर्मिनल (ECT) उभारण्याचा निर्णय घेतला होता. या करारातील 49 टक्के हिस्सा हा भारत आणि जपानचा होता. तर, 51 टक्के हिस्सा हा श्रीलंका पोर्ट टर्मिनलकडे होता. 2019 साली हा करार झाला होता. श्रीलंकेच्या कॅबिनेटनं 3 महिन्यांपूर्वी या कराराला मान्यता दिली होती. आता फक्त वेस्ट कंटेनर टर्मिनलची निर्मिती भारत आणि जपानच्या मदतीने करण्याची घोषणा श्रीलंकेनं केली आहे.

कामगार संघटनांचा होता विरोध

भारत आणि जपान यांच्याबरोबर झालेल्या कराराचा कोलंबो पोर्ट ट्रेड युनियननं विरोध केला होता. ECT वर श्रीलंकेची संपूर्ण मालकी असावी अशी त्यांची मागणी होती. श्रीलंकेतील 23 ट्रेड युनियननं या कराराला विरोधात आंदोलन सुरु केलं होतं. विशेष म्हणजे यातील बहुतेक संघटना श्रीलंका पिपल्स पार्टी (SLPP)  या सत्तारुढ पक्षाशी संबंधीत आहेत. त्यांच्या विरोधामुळेच श्रीलंका सरकारनं हा करार रद्द केला आहे.

भारताला धक्का

हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हलचालींना शह देण्यासाठी भारतानं श्रीलंकेसोबत हा करार केला होता. हा करार रद्द झाल्यानं भारताच्या परराष्ट्र धोरणाला मोठा धक्का बसला आहे.

चीनच्या जाळ्यात श्रीलंका

चीनच्या महत्त्वकांक्षी बेल्ट अँड रोड योजनेचा श्रीलंका हा प्रमुख सदस्य आहे. चीनकडून गेल्या दशकामध्ये श्रीलंकेत मोठी गुंतवणूक केली आहे. श्रीलंकेतील अनेक योजनांना चीननं कमी व्याजानं कर्ज दिलं आहे. अर्थात चीनचं हे कर्ज श्रीलंकेसाठी फार फायद्याचं नाही. त्यांना यामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: China, India, Sri lanka