Home /News /videsh /

श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांचे राजपक्षे सरकारवर गंभीर आरोप, भारताबाबत केलं मोठं वक्तव्य

श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांचे राजपक्षे सरकारवर गंभीर आरोप, भारताबाबत केलं मोठं वक्तव्य

Sri Lanka Wickremesinghe to Gotabaya govt: श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी भारताचे कौतुक केले असून भारताने आतापर्यंत कोणत्याही देशापेक्षा जास्त मदत केली असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भारताने श्रीलंकेला केवळ पैशानेच नाही तर इतर गोष्टींनीही मदत केली आहे. ते म्हणाले की, सध्याच्या गोटाबाया राजपक्षे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज देशातील जनतेला रांगेत उभे राहावे लागत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 10 एप्रिल : श्रीलंकेचे (Sri Lanka economic crisis)  माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सध्याच्या सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज श्रीलंकेची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती खड्ड्यात गेल्याचे ते म्हणाले. सध्याच्या संकटासाठी त्यांनी थेट देशाच्या सरकारला जबाबदार धरत म्हटले की गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारने नागरिकांना अन्नासाठी रांगेत उभं केलंय. रानिल विक्रमसिंघे म्हणाले, माझ्या काळात असे आर्थिक संकट कधीच आले नाही. श्रीलंकेत आमचे सरकार असताना लोकांना त्यांच्या मूलभूत गोष्टी खरेदी करण्यासाठी कधीही रांगेत उभे राहावे लागले नाही. आम्ही पंतप्रधान असताना देशाकडे सरप्लस पैसे होते विक्रमसिंघे म्हणाले, आमच्या काळात कधीच लोकांना रस्त्यावर उतरावे लागले नाही. पण सध्या हे घडत आहे. कारण, श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या अक्षमतेने देशाला संकटात ढकलले आहे. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी भारतीय वृत्तसंस्था एएनआयला ही माहिती दिली आहे. विक्रमसिंघे म्हणाले की 2019 मध्ये श्रीलंकेचे पंतप्रधान असताना देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. आमच्याकडे व्याज आणि जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी अतिरिक्त पैसे होते. पण, सध्याच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. श्रीलंकेची स्थिती 6 महिन्यांत सुधारू शकते, फक्त 'या' एकाच गोष्टीची गरज! IMF कडे जाण्यास विलंब विक्रमसिंघे म्हणाले, मोठ्या आर्थिक संकटामुळे देशात राजकीय संकटही निर्माण झाले असून देश भयंकर संकटातून जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून या सरकारने आगामी आर्थिक संकटाच्या संकेतांकडे लक्ष दिलेले नाही. मला आठवते मी सरकार सोडल्यावरही आमचा अर्थसंकल्प सरप्लस होता. आमच्याकडे आयातीसाठी पुरेसा पैसा होता. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी IMF कडे संपर्क न केल्यामुळे श्रीलंका सरकारवर टीका होत आहे. या मुद्द्यावरून विक्रमसिंघे यांनी सरकारवर टीका करत सरकारने योग्य वेळी हस्तक्षेप केला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की सरकारने अर्थपूर्ण मागणीसह योग्य वेळी आयएमएफशी संपर्क साधला नाही. ते IMF कडे जाईपर्यंत खूप उशीर झालेला असेल. भारताने सर्वाधिक मदत केली विशेष म्हणजे आता श्रीलंका सरकारने लवकरच IMF कडे प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, सरकारने परकीय चलनाच्या गंगाजळीत संसाधनांच्या रूपात फार काही सोडले आहे, असे मला वाटत नाही. आयातीचे बिल फेडण्यासाठी आता मोठ्या कंपन्यांकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दिलेली क्रेडिट लाइन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपेल. ते म्हणाले की, भारताने आतापर्यंत सर्वाधिक मदत केली आहे. भारताची मदत आपण परिणाम म्हणून समजून घेतली पाहिजे. कारण, भारताने केवळ आर्थिक मदतच केली नाही तर भारत श्रीलंकेला इतर अनेक मार्गांनी मदत करत आहे जे प्रशंसनीय आहे. विक्रमसिंघे म्हणाले, आम्ही 2020 आणि 2021 मध्येच IMF कडे जाण्याचा सल्ला दिला होता.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Sri lanka

    पुढील बातम्या