Home /News /videsh /

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, राजपक्षेच राहणार पंतप्रधान

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, राजपक्षेच राहणार पंतप्रधान

श्रीलंकेत (Sri Lanka) सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा (Resigned) दिल्याची मोठी बातमी आहे.

    कोलंबो, 04 एप्रिल: श्रीलंकेत (Sri Lanka) सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा (Resigned) दिल्याची मोठी बातमी आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये महिंदा राजपक्षे (Namal Rajapaksa) यांचा मुलगा नमल राजपक्षे यांचाही समावेश आहे. याशिवाय मित्र पक्षाच्या सरचिटणीसांनीही राजीनामा दिला आहे. सरकारमधल्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे (Economic Crisis) सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्री परिषदेच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्या पदावर फक्त महिंदा राजपक्षेच राहिले आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या पक्षाने त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावलं आहे. पंतप्रधानांच्या मुलानंही सोडलं केंद्रीय मंत्रीपद विशेष म्हणजे, श्रीलंकेत सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नमल हे श्रीलंकेचे केंद्रीय क्रीडा मंत्री होते. राजीनाम्यावर काय म्हणाले नमल राजपक्षे? नमल राजपक्षे यांनी ट्विट केलं की, 'मी राष्ट्राध्यक्षांच्या सचिवांना माझ्या सर्व विभागांचा राजीनामा तत्काळ प्रभावानं कळवला आहे. आशा आहे की ते महामहिम आणि पंतप्रधानांना श्रीलंकेच्या लोकांमध्ये आणि सरकारमध्ये स्थिरता आणण्यासाठी निर्णय घेण्यास मदत करेल. मी माझ्या मतदारांसाठी, माझ्या पक्षासाठी आणि हंबनटोटाच्या जनतेशी वचनबद्ध राहीन. श्रीलंका फ्रीडम पार्टीचे सरचिटणीस, श्रीलंकेतील महिंदा राजपक्षे यांचा सत्ताधारी पक्ष श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) यांचा मुख्य सहकारी, महिंदा राजपक्षे सरकारमधील खासदार आणि मंत्री दयाश्री जयसेकरा यांनीही राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना पत्र लिहून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दयाश्री यांनी आपल्या पत्रात श्रीलंकेच्या आर्थिक संकटासाठी सरकारला जबाबदार धरले आणि लोकांच्या हितासाठी सरकारमध्ये राहणे योग्य होणार नाही, असं म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Sri lanka

    पुढील बातम्या