पाकचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

पाकचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोह प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • Share this:

लाहोर, 17 डिसेंबर : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोह प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने सरकारला सोमवारी नोटिस पाठवली होती. मुशर्रफ यांनी त्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा खटला आणि इतर कारवाई असवैधानिक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने इस्लामाबादच्या विशेष न्यायालायत झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.

तीन सदस्यीय विशेष न्यायालायत देशद्रोहाचा खटल्याचा निर्णय देण्यात आला. याआधी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालायला निर्णय देण्यापासून थांबवण्याचे आदेश दिले होते. गेल्या महिन्यात हा निर्णय राखून ठेवला होता.

गेल्या दोन वर्षांपासून मुशर्रफ दुबईत वास्तव्य करत आहे. संविधानाचा भंग केल्या प्रकरणी आणि 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल कऱण्यात आला होता. सध्या 76 वर्षांचे असलेले मुशर्रफ दुबईत उपचार घेत आहेत. तब्येतीचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात परतण्यास नकार दिला होता.

Tags: pakistan
First Published: Dec 17, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading