Home /News /videsh /

11 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती; Abortion वरून इथे देशभर उडाली खळबळ

11 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती; Abortion वरून इथे देशभर उडाली खळबळ

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

11 वर्षांची मुलगी तिच्या सावत्र आजोबांनी लैंगिक अत्याचार (Grandfather Rape on minor girl) केल्यानं गर्भवती राहिली. ती 5 महिन्यांची गर्भवती होती. या खुलाशानंतर तिच्या आजोबाची तुरुंगात रवानगी झाली.

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : अल्पवयीन 11 वर्षीय मुलगीच्या गर्भपातावरून (abortion)  चांगलाच वाद निर्माण झाला आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मुलीच्या गर्भपाताचे समर्थन केले, तर काही धार्मिक संघटनांनी या गर्भपाताला विरोध केलाय. ही 11 वर्षीय मुलगी तिच्या सावत्र आजोबांनी (वय 61) केलेल्या बलात्कारानंतर गर्भवती (Pregnant Girl) राहिली. या घटनेवरून दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तिच्या गर्भपातावरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, 11 वर्षांची मुलगी तिच्या सावत्र आजोबांनी लैंगिक अत्याचार (Grandfather Rape on minor girl) केल्यानं गर्भवती राहिली. ती 5 महिन्यांची गर्भवती होती. या खुलाशानंतर तिच्या आजोबाची तुरुंगात रवानगी झाली, मात्र मुलीच्या गर्भधारणेवरून गदारोळ वाढला. कारण एकीकडे मानवाधिकार संघटना मुलीला गर्भपात करण्याचा सल्ला देत होत्या, तर कॅथॉलिक चर्च आणि धार्मिक संघटना त्या विरोधात होत्या. या प्रकरणावरून दोन्ही मतांच्या लोकांमध्ये जोरदार वादावादी झाली. या प्रकरणात कॅथोलिक चर्चच्या हस्तक्षेपावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धार्मिक गटांनी पीडितेच्या आईशी संपर्क साधून गर्भपात न करण्यास त्यांना राजी केल्याचा दावा केला. मात्र, मानवाधिकार संघटना आणि गर्भपात कायद्यामुळे पीडित कुटुंबाने आपला निर्णय बदलला. हे वाचा - इथे नागरिकांना कचरा उचलण्यासाठी मिळतात पैसे, लोक मोठ्या प्रमाणात जमा करता Garbage मुलीला गरोदर असण्याचा अर्थही माहीत नव्हता बोलिव्हियन महिला हक्क कार्यकर्त्या आना पाओला गार्सिया म्हणाल्या, "मुलीला हे देखील माहीत नव्हतं की, गर्भवती असणं म्हणजे काय? तिनं एकेदिवशी आपल्या चुलत भावाला सांगितलं की, माझ्या पोटात काहीतरी हलत आहे. चुलत भावाने तिच्या आईला याबाबत सांगितलं आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली." त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि नराधम आजोबाची रवानगी तुरुंगात करण्यात आली. हे वाचा - महिला पोलिसाचा ‘बाहुबली’ अवतार, बेशुद्ध नागरिकाला घेतलं खांद्यावर; Video पाहून वाटेल अभिमान त्यांनी पुढे सांगितले की, मुलीला महिला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे कायद्यानुसार बलात्कार पीडितेचा गर्भपात करण्यात आला. सोमवारी रुग्णालयात उपचार केल्यानंतर मुलगी आता बरी झाली आहे. बोलिव्हियाचे आरोग्य आणि क्रीडा मंत्री जेसन ओझा याप्रकरणी म्हणाले की, 'मुलीची प्रकृती स्थिर आहे आणि मुलीच्या आरोग्याचे आणि जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आम्ही कायद्याने आवश्यक असलेली सर्व खबरदारी घेतली आहे.' महत्त्वाचे म्हणजे बोलिव्हियामध्ये गर्भपात सामान्यतः बेकायदेशीर आहे. तथापि, लैंगिक अत्याचार, जन्मजात विकृती किंवा आईच्या जीवाला धोका असताना गर्भपात केला जाऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rape case, Rape on minor

    पुढील बातम्या