Home /News /videsh /

या देशात आता 4 दिवसांचा कामकाजाचा आठवडा, युरोपमध्ये असा उपक्रम राबवणारा पहिला देश

या देशात आता 4 दिवसांचा कामकाजाचा आठवडा, युरोपमध्ये असा उपक्रम राबवणारा पहिला देश

स्पेनमध्ये (Spain) आता कामकाजाचा आठवडा (Work Week) हा फक्त चार दिवसांचा म्हणजे 32 तासांचा (32 Hours) असणार आहे.

नवी दिल्ली, 18 मार्च : स्पेनमध्ये (Spain) आता कामकाजाचा आठवडा (Work Week) हा फक्त चार दिवसांचा म्हणजे 32 तासांचा (32 Hours) असणार आहे. स्पेन सरकारनं सध्या प्रायोगिक तत्वावर (Pilot Project) हा बदल करण्यास मान्यता दिली आहे. असा प्रयोग करणारा हा युरोपमधील (Europe) पहिला देश आहे. फेब्रुवारीमध्ये इच्छुक कंपन्यांना सरकारनं असा बदल करण्यास मान्यता दिली आहे. डाव्या विचारसरणीच्या मेस पेस (Mas Pais) पक्षानं ही कल्पना सरकारसमोर मांडली. याबाबत मेस पेसचे हेक्टर टेजेरो (Héctor Tejero) म्हणाले की, तीन वर्षे कालावधीचा हा प्रकल्प असून, यात सुमारे 200 कंपन्या सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. 3 ते 6 हजार कामगार यात सहभागी होतील. यासाठी 50 दशलक्ष युरो खर्च अपेक्षित आहे. आम्हाला कामाचे तास कमी करायचे आहेत; यामुळं नोकऱ्या किंवा पगार कपात होणं अपेक्षित नाही, त्यामुळं त्याबाबत दक्षता घ्यायची आहे, असंही टेजेरो म्हणाले. दी गार्डियनच्या वृत्तानुसार, स्पेनला लवकरात लवकर याची चाचणी घ्यायची आहे. स्पेनमध्ये वर्षानुवर्षे चार दिवसांच्या कामकाजी आठवड्याचा आग्रह केला जात आहे. यामुळं कामगारांची उत्पादनक्षमता (Production Capacity) वाढेल तसंच काम आणि वैयक्तिक आयुष्य (Work and Life) यांचं उत्तम संतुलन साधलं जाईल, असा विश्वास या प्रस्तावाच्या पाठीराख्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या साथीमुळं (Corona Pandemic) सध्या काम करण्याच्या पद्धतीत विशेष बदल झाला आहे. त्यामुळं काही देशांमध्ये या प्रस्तावाबाबत विश्वास वाढला आहे. आता स्पेन पहिल्यांदा ही संकल्पना प्रत्यक्षात राबवत आहे. 32 तासांच्या कामाच्या आठवड्यामुळं कर्मचारी ऑफीसमध्ये कमी वेळ घालवतील;पण त्यांच्या पगारामध्ये कोणताही बदल होणार नाही. (हे वाचा-Explainer : चीनवर घोंघावतंय का घोंघावतंय पिवळं विनाशकारी वादळ?) वृत्तपत्राने स्पेनच्या उद्योग मंत्रालयातील सूत्राचा हवाला देत असं म्हटलं आहे की, या प्रकल्पावरील चर्चा मान्यतेच्या अवस्थेत असून, वेगवेगळ्या पैलूंवर चर्चाही सुरू आहे. स्पेनमध्ये 4 दिवसांच्या आठवड्याच्या संकल्पनेला पाठिंबा मिळत आहे, मात्र शाळा, विद्यापीठे आणि इतर सार्वजनिक प्रशासन आणि संस्था यांचा या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा मिळालेला नाही. स्पेनमध्ये या प्रस्तावाला आताच पाठिंबा मिळत आहे, असं नाही. आधीपासून फर्लो प्रोग्राम अंतर्गत अशी संकल्पना राबवली जात आहे. बर्‍याच कामगारांना आठवड्यातून कमी वेळ काम करण्यासाठी किंवा नाही केले तरी मोबदला दिला जातो. मे 2020मध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनीही चार दिवसांचा कामकाजी आठवडा करण्याचा कंपन्यांचा प्रस्ताव मान्य करण्याबाबत अनुकूलता दर्शविली होती. वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्ट, शेक शॅक अशा काही बड्या कंपन्यांनी पूर्वी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचा प्रयत्न केला होता. (हे वाचा-काय ही हौस! या 72 वर्षांच्या आजोबांच्या शरीरावर आहेत 85 टॅटू!) चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचं समर्थन करणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की, जास्तीत जास्त लोकांना कमी तास काम करण्याची परवानगी दिली गेली तर अनेक देशांमध्ये सध्या साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या मोठ्या संकटावर मात करणं शक्य होईल, मात्र बहुतांश व्यावसायिकांनी वेतनात कपात न करता कामाचे तास कमी करण्याबद्दल निरुत्साह दाखवला आहे. त्यामुळं स्पेनमध्ये यासाठी येणाऱ्या खर्चाची भरपाई करण्याचा प्रस्तावही मांडण्याचा विचार होत आहे.
First published:

Tags: International, Spain

पुढील बातम्या