पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोना झाल्यानंतर देशात आणीबाणी, एका दिवसात 1500 रुग्ण

कोरोनाच्या धास्तीनं आता जगभरात अनेक देशांनी आणीबाणी लागू करण्यास सुरवात केली आहे. अमेरिकेनंतर आणखी दोन देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

कोरोनाच्या धास्तीनं आता जगभरात अनेक देशांनी आणीबाणी लागू करण्यास सुरवात केली आहे. अमेरिकेनंतर आणखी दोन देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

  • Share this:
    मद्रीद, 15 मार्च : कोरोनाच्या धास्तीनं आता जगभरात अनेक देशांनी आणीबाणी लागू करण्यास सुरवात केली आहे. अमेरिकेनंतर आता कॅनडातही आणीबाणी लागू केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडे यांच्या पत्नीनंतर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांच्या पत्नीलाही कोरोना झाला आहे. इटलीप्रमाणेच स्पेनमध्येही कोरोना वेगानं पसरत आहे. स्पेनच्या एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 1500 रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 6251 वर पोहोचली आहे. गार्डियनच्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसचे इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्यानंतर स्पेनच्या सरकारने आणीबाणी घोषित केली आहे. सरकारने लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. फक्त वैद्यकीय इमर्जन्सी आणि खाण्यापिण्याच्या गरजेसाठी घरातून बाहेर पडता येईल. स्पेनच्या पंतप्रधानांनी जवळपास 7 तास मंत्रिमंडळाची बैठक घेतल्यानंतर आणीबाणीचा निर्णय घेतला. त्यांनी देशवासियांना एक मेसेज दिला असून त्यात म्हटलं की, सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आहे. यामुळे आणीवाणीसारखा निर्णय घ्यावा लागला. हेल्थ-सोशल अँड इकॉनॉमिक क्रायसिस असल्याचं पंतप्रधान सँचेज यांनी म्हटलं. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे 193 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा : कोरोनाचा कहर, मुलाने हॉस्पिटलच्या खिडकीतून पाहिलं वडिलांचं शव लोकांनी भीती न बाळगता खबरदारी घ्यावी असं आवाहन पंतप्रधान सँचेज य़ांनी म्हटलं.  घाबरून जाऊ नका, घरता रहा. सुपर मार्केट, लहान खाण्याची दुकानं, मेडिकल स्टोअर्स आणि पेट्रोल पंप सुरू राहतील. आणीबाणीच्या काळात तुम्हाला फक्त औषधे आणि खाण्यापिण्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडता येईल. हे वाचा : भारतात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार, 4 देशांनंतर आता पाकिस्तान बॉर्डरही सील
    First published: