मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोनामुळे 'या' देशात लोकांची मृत्यूशी झुंज, बेशुद्ध करून सोडलं देवाच्या भरवश्यावर

कोरोनामुळे 'या' देशात लोकांची मृत्यूशी झुंज, बेशुद्ध करून सोडलं देवाच्या भरवश्यावर

स्पेनमध्ये एक लाख 20 हजार लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर आतापर्यंत येथे सुमारे 12 हजार लोक मरण पावले आहेत.

स्पेनमध्ये एक लाख 20 हजार लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर आतापर्यंत येथे सुमारे 12 हजार लोक मरण पावले आहेत.

स्पेनमध्ये एक लाख 20 हजार लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर आतापर्यंत येथे सुमारे 12 हजार लोक मरण पावले आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
माद्रिद, 05 एप्रिल : स्पेनमध्ये 1 लाख 20 हजार लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर आतापर्यंत येथे सुमारे 12 हजार लोक मरण पावले आहेत. दरम्यान, येथील वृद्धाश्रमांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या आश्रमांमध्ये त्यांची देखभाल करण्यासाठी लोकं नाही आहेत. त्यामुळे वृद्धांना घरात कैद करण्यात आले आहे. खरं तर, स्पेनमधील बहुतेक सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार केले जातात, अशा परिस्थितीत येथे सामान्य आजारांचा उपचार केला जात नाही आहेत. अशा लोकांकरिता केअर होमची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र केअर होममध्ये काम करण्यासाठी लोकं मिळत नसल्यामुळे ते ओस पडले आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास दोन तृतीयांश लोकांना सुट्टी देण्यात आली आहे. वाचा-FACT CHECK : तुफान लोकप्रिय असणारी PUBG गेम बंद करण्याचा कंपनीने घेतला निर्णय? वाचा-एकीकडे 12 हजार लोकांचा मृत्यू, तरी स्पेनमधील 'या' शहराने रोखला कोरोना केअर होममध्ये काळजी घेणारे लोकं नाहीत येथील रहिवासी मारिया जोस अल्वारेझ सांगतात की, "आजकाल जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी कोणीही नसते. त्यांना बेशुद्ध करून सोडले जात आहे. देवावर आम्ही आमचं जगणं सोडलं आहे". कोरोनाची लागण 60 वर्षांजास्त वय असलेल्या लोकांमध्ये जास्त पाहायला मिळते. त्यामुळं वृद्धांची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे वृद्धाश्रमात लोकांवर उपचार करण्यासाठी माणसं नाही आहेत. वाचा-अस्सलाम अलैकुम! 'आम्हाला तुमचा अभिमान', पाकने केले Air Indiaचे कौतुक 12 हजार लोकांचा मृत्यू स्पेनमध्ये आतापर्यंत 12 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, माद्रिदमध्ये एका नर्सिंग होममध्ये 3 हजार लोकांचा मृत्य़ू झाला. असे म्हटले जाते की यापैकी सुमारे 2 हजार लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर, यापैकी बर्‍याच जणांची चाचणी घेण्यात आली नसल्याचा दावाही केला जात आहे. आता लोक तिथल्या हॉस्पिटल केअर होममधील लोकांना प्रवेश देत नाहीत. सरकारी आकडेवारीनुसार केअर होममध्ये राहणाऱ्या 40 टक्के लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या