कॅटलोनियाची स्वायत्तता संपुष्टात; स्पेन सरकारचा निर्णय

कॅटलोनियाची स्वायत्तता संपुष्टात; स्पेन सरकारचा निर्णय

स्पेनमधील कॅटलोनिया प्रांताच्या संसदेने स्पेनपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा शुक्रवारी केली. याआधीच स्वातंत्र्यासाठी झालेल्या सार्वमतामध्ये कॅटलोनियाने स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला होता.

  • Share this:

28 ऑक्टोबर: स्पेनमधील कॅटलोनिया प्रांताच्या संसदेने स्पेनपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा शुक्रवारी केली. याआधीच स्वातंत्र्यासाठी झालेल्या सार्वमतामध्ये कॅटलोनियाने स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला होता.त्यामुळे कॅटेलोनियाची स्वायत्तता संपवून स्पेनच्या संसदेची थेट राजवट स्पेन सरकारने कॅटेलोनियावर बसवली आहे.

कॅटलोनिया स्पेनमधला एक प्रांत आहे.त्याला काही प्रमाणात स्वायत्तता दिली होती. या प्रांतातून स्वातंत्र्याची मोठ्या प्रमाणात मागणी होती. यासंदर्भात कॅटेलोनियात 1 ऑक्टोबरला सार्वमत घेण्यात आलं होतं. या सार्वमताला स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्थगिती दिली होती. तरीही त्या स्थगितीस झुगारून कॅटेलोनियाने हे सार्वमत घेतलं. तरीही काही काळासाठी या सार्वमताचा कौल स्थगित ठेवण्यात आला होता. कॅटलोनिया हे एक स्वतंत्र, सामाजिक लोकशाहीवादी राष्ट्र असून त्याला स्वत:ची ओळख मिळाली पाहिजे, असे या 'देशाच्या' संसदेने म्हटले आहे.

एकीकडे कॅटेलोनियाच्या संसदेने असं म्हटलं असलं तरी स्पेनने मात्र या संसदेलाच स्थगिती दिली आहे.आतापर्यंत या प्रातांस जी स्वायत्तता होती ती स्पेन सरकारने काढून घेतली आहे. एवढंच नाही तर डिसेंबरमध्ये प्रांतीय निवडणुकाही कॅटेलोनियात जाहीर केल्या आहेत. दरम्यान युरोपीय महासंघाने याबाबतीत काहीही हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

First published: October 28, 2017, 11:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading