युरोपियन देशात स्पेन 'कोरोना'चा नवा केंद्रबिंदू, 24 तासांत 100 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

युरोपियन देशात स्पेन 'कोरोना'चा नवा केंद्रबिंदू, 24 तासांत 100 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

इटलीनंतर आता स्पेनला (spain) मध्ये कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) उद्रेक झाला आहे.

  • Share this:

मेड्रिड, 15 मार्च : चीनच्या (China) वुहाननंतर (wuhan) जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरस (coronavirus) इतर देशांमध्ये थैमान घालतो आहे. युरोपियन देशांना या व्हायरसने लक्ष्य केलं आहे. इटलीनंतर आता स्पेनला (spain) या व्हायरसने आपला नवा केंद्रबिंदू बनवला आहे.

स्पेनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 24 तासांत तब्बल 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2,000 लोकांना लागण झाली आहे. युरोपमध्ये इटलीनंतर आता स्पेनवर कोरोनाव्हायरसने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे.

स्पेनने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 7,753 वर पोहोचली आहे. त्यापैकी 288 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील परिस्थिती पाहता सरकारने देशभर बंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

स्पेनमधील मृतांचा आकडा वाढल्यानंतर जगभरात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 6,036 वर पोहोचली आहे. तर तब्बल 1,59,844  या विषाणूची लागण झाली आहे, AFP ने ही आकडेवारी दिली आहे.

चीनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 3,199  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता हा महाभयंकर विषाणू युरोपमध्येही झपाट्याने पसरतो आहे.

हे वाचा - कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी एमर्जन्सी फंड, भारताकडून तब्बल 7 कोटी रुपयांचं योगदान

First published: March 15, 2020, 9:41 PM IST

ताज्या बातम्या