स्पेस एक्सनं अंतराळात सोडलं महाकाय रॉकेट; रॉकेटमधून टेस्लाची इलेक्ट्रिक कारही झेपावली

स्पेस एक्सनं अंतराळात सोडलं महाकाय रॉकेट; रॉकेटमधून टेस्लाची इलेक्ट्रिक कारही झेपावली

टेस्ला रोडस्टर ही इलेक्ट्रिक कार सूर्यमालेच्या अमर्याद कक्षेत पृथ्वीपासून दूर मंगळ ग्रहापर्यंत पाठवण्यात आलं असल्याचं सांगितलं जातंय.

  • Share this:

08 फेब्रुवीरी : अमेरिकेची खासगी रॉकेट कंपनी स्पेस एक्सने जगातलं सर्वात शक्तीशाली रॉकेट प्रक्षेपित केलं आहे. 'फाल्कन हेवी' असं या महाकाय रॉकेटचं नाव आहे. फ्लोरिडातील एका प्रक्षेपण स्थळावरून निरभ्र आकाशात मंगळवारी हे रॉकेट घोंघावत गेलं. ही या रॉकेटची प्रायोगिक चाचणी होती. याच ठिकाणाहून पहिल्या चांद्र मोहिमेलाही सुरुवात झाली होती.

ही कंपनी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांची आहे. हे महाकाय रॉकेट सुमारे २३ मजली उंच आहे. या रॉकेटमधून लाल रंगाची टेस्ला रोडस्टर ही कारही अवकाशात झेपावली आहे. या रॉकेटचं वजन सुमारे ६३.८ टन म्हणजेच सुमारे दोन अवकाशयानांइतकं आहे. या रॉकेटमध्ये २७ मर्लिन इंजिन असून याची लांबी २३० फूट आहे.

स्पेस एक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कॅलिफोर्नियातील हावथर्न येथील मुख्यालयातून या प्रक्षेपणाचं थेट लाइव्ह स्ट्रिमिंग पाहिलं. स्पेस सेंटरपासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर विज्ञानप्रेमींनी हे लॉन्च पाहण्यासाठी एका बीचजवळ गर्दी केली होती. टेस्ला रोडस्टर ही इलेक्ट्रिक कार सूर्यमालेच्या अमर्याद कक्षेत पृथ्वीपासून दूर मंगळ ग्रहापर्यंत पाठवण्यात आलं असल्याचं सांगितलं जातंय. या गाडीत चालकाच्या जागी यंत्रमानव असेल. या मोहिमेसाठी हे चाचणी प्रक्षेपण करण्यात आलं.

First published: February 8, 2018, 9:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading