नोवोसिबिर्स्क, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. काही देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलं आहे. यात अमेरिका, इटली, स्पेन, इराण या देशांमध्ये तर मृत्यूचं थैमान सुरू आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. मात्र देशातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जगात अशीही काही ठिकाणं आहेत जिथं अद्याप कोरोनाची प्रकऱणं समोर आलेली नाही. यापैकी एक आहे रशियातील दक्षिण सैबेरिया.
दक्षिण सैबेरियातील अल्टाइ भागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. लोक याचं श्रेय एका गूढ अशा प्राचीन ममीला देत आहेत. ही ममी गोरोन अटलाइस्कमधील संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. याबाबतचं वृत्त मॉस्को टाइम्सनं दिलं आहे. त्यानुसार ही ममी 2400 वर्षांपूर्वीची आहे. 1993 मध्ये सैबेरियातील परमाफ्रॉस्ट भागात खोदकाम करताना ममी सापडली होती. परमाफ्रॉस्ट त्या भागाला म्हटलं जातं जिथं दोन वर्षांपासून गोठलेलं वातावरण असतं किवा नेहमीच तापमान झिरो डिग्री असतं. सैबेरियन आईस मेडन या नावानंही हा भाग ओळखला जातो.
स्थानिक लोकांची अशी समजूत आहे की, कोणताही धोका असतो किंवा एखादा आजार जगभर पसरतो तेव्हा देवी त्यांची सुरक्षा करते. या भागाची लोकसंख्या 2 लाख 20 हजार इतकी आहे. मात्र अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. याचं सर्व श्रेय प्रशासनाने सेल्फ आयसोलेशनला दिलं आहे. मात्र देवीचा आशीर्वाद असल्याचंही नाकारलेलं नाही.
सरकारने सुरुवातीलाच आयसोलेशनसाठी पावले उचलली होती. त्यामुळे भागात कोरोनाची प्रकरणं आढळली नाहीत. स्थानिक अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं की, इथले लोक ममीची पूजा करतात आणि त्यामुळे आम्ही सुरक्षित असल्याची त्यांची भावना आहे. ममीची काळजी एखाद्या खजान्याप्रमाणे घेतली जाते. कारण ती ममी संरक्षण करते असं लोक मानतात.
हे वाचा : स्पेनमध्ये तासाला 20 लोकांचा होतोय मृत्यू, संपूर्ण गाव तयार करतंय शवपेट्या
ममी जेव्हा राजधानी नोवोसिबिर्स्क शहरात नेण्यात आली होती तेव्हा भूकंप झाला होता. त्यावेळी स्थानिकांमध्ये भीती पसरली होती. ममीला इथून नेल्यामुळे असं झाल्याचं आणि ममीला कोणीही हात लावायला नको होता असंही लोक म्हणत होते. या ममीला प्रिन्सेस ऑफ युकोक आणि अल्टाइ प्रिन्सेस नावानं ओळखतात. प्रिन्सेस ऑफ युकोक इसवी सन पूर्व सातव्या ते तिसऱ्या शतकाच्या काळातील असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
हे वाचा :
आयसोलेशनमध्ये अनोळखी लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवतायत कोरोना संशयित रुग्ण
भरपूर अलंकार आणि सहा घोड्यांसह या ममीला दफन करण्यात आलं होतं. ममीच्या पूर्ण शरिरावर टॅटू आहेत. पुरातत्ववाद्यांनी असा निष्कर्ष काढला की संबंधित महिला धार्मिक असावी. तिच्याकडे काही वैद्यकीय उपचाराची विद्या असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. खोदकाम करताना लाकडी, कांस्य आणि सोन्याच्या दागिण्यांशिवाय एका भांड्यात भांगही सापडली होती.
(न्यूज 18 लोकमत या बातमीतून कोणत्याही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही)
हे वाचा : अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना भारतीय महिलेनं घेतला शेवटचा श्वास
संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.