एक नाईट क्लब झाला हॉटस्पॉट, पार्टीला गेलेले 700हून अधिक लोक निघाले कोरोना पॉझिटिव्ह

एक नाईट क्लब झाला हॉटस्पॉट, पार्टीला गेलेले 700हून अधिक लोक निघाले कोरोना पॉझिटिव्ह

आतापर्यंत, 700 हून अधिक लोकांना पब होपिंगमुळे कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

सोल, 13 मे : जगभरात कोरोनानं थैमान घातले आहे. मात्र काही देशांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कमी आहे. यातील एक देश म्हणजे दक्षिण कोरिया. मात्र आता या देशाचीही चिंता वाढली आहे. याचे कारण आहे, दक्षिण कोरियाचील नाईट क्लब. दक्षिण कोरियाने जवळजवळ संक्रमणावर मात केली होती, मात्र आता परंतु सोल नाईट क्लब पुन्हा त्याचे केंद्र बनले आहे. या नाईट क्लबमधून 119 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर दक्षिण कोरियाचे पंतप्रधान चुंग स्य-किन यांनी सोलच्या नाईट क्लबमध्ये गेलेल्या सर्वांना आवाहन केलं आहे.

दरम्यान, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे की, या नाईट क्लबमध्ये हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित होते. सोलमधील या ट्रेकिंगच्या आधारे, तीन दिवसांत 22 हजारहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, क्लस्टर संक्रमणाचे हे देशातील पहिले प्रकरण आहे. सध्या 10 बार आणि क्लब मधील सर्व लोकांचा शोध घेत आहेत. दक्षिण कोरियात एप्रिलच्या शेवटी संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर नाईट क्लब उघडले गेले.

वाचा-कोरोना संदर्भातील सर्वात मोठा डेटा लीक, जगासमोर झाली चीनची पोलखोल

आरोग्य अधिकारी सध्या या भागातील रहिवाशांच्या मोबाइल जीपीएस व क्रेडिट कार्ड रेकॉर्डवरून लोकांचा मागोवा घेत आहेत. दरम्यान, काही लोकांनी क्लबमध्ये गेल्याची माहिती लपवली, त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या क्लबमधून 25 वर्षांच्या शिक्षकानं सहा विद्यार्थ्यांसह आठ जणांना संसर्गित केले आहे. या व्यक्तीचा मोबाइल फोनवरून शोध लागला.

वाचा-लॉकडाऊन हटवणं पडलं महागात, आता वुहान करणार 1.11 कोटी लोकांची कोरोना चाचणी

पब हॉपिंगमुळे बिघडली परिस्थिती

आतापर्यंत, 700 हून अधिक लोकांना पब होपिंगमुळे कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातील 2 लोकं चर्चमध्येही गेले होते. तिथं 500 लोकांना कोरोना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहराच्या या भागात 700 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. शहरातील या भागात 40 पेक्षा जास्त नाईट क्लब आहेत आणि बर्या्च वेळा लोक एकापेक्षा जास्त क्लबमध्ये जातात. या संस्कृतीला पब होपिंग म्हणतात. यामुळं दक्षिण कोरियात पुन्हा कोरोनानं शिरकाव केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाचा-अमेरिकेचा सर्वात मोठा खुलासा, चीन आणि WHOचा असा होता कोरोना संदर्भातला प्लॅन

First published: May 13, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या