मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Omicron उदयास आलेल्या देशात Lockdown, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या दुप्पट

Omicron उदयास आलेल्या देशात Lockdown, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या दुप्पट

Omicron Cases in South Africa: दक्षिण आफ्रिकेत एकूण पाच प्रकारचे लॉकडाऊन लागू केले जाऊ शकतात. यामध्ये, सर्वात कडक लॉकडाऊन पाचव्या श्रेणीचा मानला जातो.

Omicron Cases in South Africa: दक्षिण आफ्रिकेत एकूण पाच प्रकारचे लॉकडाऊन लागू केले जाऊ शकतात. यामध्ये, सर्वात कडक लॉकडाऊन पाचव्या श्रेणीचा मानला जातो.

Omicron Cases in South Africa: दक्षिण आफ्रिकेत एकूण पाच प्रकारचे लॉकडाऊन लागू केले जाऊ शकतात. यामध्ये, सर्वात कडक लॉकडाऊन पाचव्या श्रेणीचा मानला जातो.

  • Published by:  Pooja Vichare

डरबन, 03 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवीन व्हेरिएंट (Omicron Variant)ओमिक्रॉन जगभरात वेगानं पसरत आहे. हा व्हेरिएंट एका आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेतून (Omicron Cases in South Africa) 25 देशांमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वात वाईट परिस्थिती सुरू आहे. येथे एकाच दिवसात ओमिक्रॉन प्रकरणं दुप्पट झाली आहेत. परिस्थिती किती चिंताजनक आहे, याचा अंदाज यावरून लावता येत आहे की, दक्षिण आफ्रिकेत लेव्हल वन लॉकडाऊन (Lockdown)लागू करण्यात आला आहे. बाजारपेठा बंद आहेत, रस्ते सुनसान आहेत आणि लोक पुन्हा त्यांच्या घराच्या भिंतींमध्ये कैद झालेले दिसत आहेत.

दक्षिण आफ्रिकेत एकूण पाच प्रकारचे लॉकडाऊन लागू केले जाऊ शकतात. यामध्ये, सर्वात कडक लॉकडाऊन पाचव्या श्रेणीचा मानला जातो. सध्या लॉकडाऊनच्या पहिल्या श्रेणीपासून लोक चिंतेत आहेत. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

हेही वाचा- IND vs NZ: केन विल्यमसन मुंबई टेस्टमधून Out, 'या' खेळाडूकडं न्यूझीलंडचं नेतृत्त्व 

दक्षिण आफ्रिकेवर अनेक देशांनी प्रवासी बंदी घातल्यानेही नुकसान होत आहे. अमेरिका, कॅनडा, ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर यासारख्या अनेक देशांचा या यादीत समावेश आहे.

24 नोव्हेंबर रोजी पहिले प्रकरण आलं समोर

24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचं पहिले प्रकरण नोंदवलं गेलं. त्यावेळी स्वतःच आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली होती की, त्यांच्या देशात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट सापडलं आहे. ज्याचे 30 पेक्षा जास्त वेळा उत्परिवर्तन झाले आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरियंटच्या तुलनेत खूप वेगानं पसरण्याची भीती आहे.

हेही वाचा- Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी: ICMR

देशातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 11 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालये रुग्णांनी भरलेली असून आरोग्य सेवा कोलमडली आहे.

ग्वाटेंग प्रांतातून 77 नमुने घेण्यात आले

15 नोव्हेंबरच्या सुमारास, ग्वाटेंग प्रांतातून 77 नमुने घेण्यात आले आणि अनुक्रमित केले गेले. सखोल तपासणीनंतर, तज्ज्ञ निष्कर्षापर्यंत पोहोचले की, हा कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट आहे. त्याचे जनुक पकडले जात नव्हते कारण त्याचे उत्परिवर्तन झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन प्रकाराला B.1.1.529 म्हणजेच Omicron असे नाव दिले आहे. 26 नोव्हेंबर रोजी हे चिंताजनक व्हेरिएंट घोषित करण्यात आलं. तेव्हापासून हा नवीन व्हेरिएंट 24 देशांमध्ये सापडला आहे.

सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल जगाला माहिती देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी दिलासा देणारा दावा केला आहे. या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट प्राथमिक स्तरावर डेल्टा प्रकारापासून सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, नवीन व्हेरिएंटमध्ये रुग्णांना थकवा, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसत आहेत.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus