मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बाप की हैवान? एका खुर्चीसाठी हातात कुऱ्हाड घेऊन मुलाला मारायला गेला पण...

बाप की हैवान? एका खुर्चीसाठी हातात कुऱ्हाड घेऊन मुलाला मारायला गेला पण...

भयंकर! एका राजानेची केला आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न, अंगावर काटा आणणारी घटना.

भयंकर! एका राजानेची केला आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न, अंगावर काटा आणणारी घटना.

भयंकर! एका राजानेची केला आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न, अंगावर काटा आणणारी घटना.

  • Published by:  Priyanka Gawde
केप टाऊन, 16 मार्च : मुलगा आणि वडील यांचे नाते हे आई-मुलापेक्षा वेगळे असते. मात्र या नात्यात एवढी क्रुरता नसते की वडील आपल्याच मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न करतील. मात्र असा धक्कादायक प्रकार एका राजघराण्यात घडला. दक्षिण आफ्रिकेचाराजा थेंबू राजाने चक्क आपल्या मुलाला कुऱ्हाडीने मारण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी थेंबू राजाला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे थाबू हे नेल्सन मंडेला यांचे पुतणे आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, थेंबू राजदा बुयेलेखाया दालिंदयेबो शुक्रवारी पहाटे कुऱ्हाड घेऊन राजमहालात पोहचला. आपल्या मुलाचा शोध घेत असताना त्याला सुरक्षा रक्षकांनी पाहिले. मात्र थेंबू राजाचा मुलगा याआधीच तेथून पळून गेला होता. वाचा-नववीत शिकणाऱ्या मुलीला देह विक्रीत ढकलण्याचा होता डाव, पोलिसांनी अशी केली सुटका मुख्य म्हणजे दालिंदयेबो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पॅरोलवर तुरूंगातून बाहेर आला होता. दालिंदयेबो यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या मुलाने स्वत:ला काळजीवाहू राजा म्हणून घोषित केले होते, ज्यामुळे दालिंदयेबो संतापला होता. दरम्यान, शाही प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात खिडकीतून उडी मारून मुलाने आपला जीव वाचवला. परंतु यासगळ्यात राजाची पत्नी जखमी झाली आहे. नेल्सन मंडेला यांचे पुतणे दालिंदयेबो यांच्यावर अपहरण, छळ व जाळपोळीच्या घटनेत दोषी ठरविण्यात आले होते. यानंतर, 2015 मध्ये त्यांना 12 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर गेल्या डिसेंबरपासून पॅरोलवर बाहेर आले होते. वाचा-कोरोना व्हायरसची अफवा पसरवल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल तुरूंगात असतानाच त्याचा मुलगा अजेनाथी जेनेलिज्वे दालिंदयेबो यांना काळजीवाहू घोषित करण्यात आले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात राजघराण्याने अजेनाथीला किमान आणखी एक वर्ष राजा म्हणून कम करावे लागेल. तेव्हापासून दालिंदयेबो नाराज होते. गेल्या डिसेंबरमध्ये बुइलखेया तुरूंगातून बाहेर आल्यावर रॉयल फॅमिलीमध्ये तणावाचे वातावरण होते. परिस्थिती एवढी टोकाला पोहचली की त्यांनी, आपल्या मुलाला म्हणजेच राजाला भेटण्यास नकार दिला होता. वाचा-नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर तरुण आणि तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO शाही प्रवक्त्यांनी दिलेल्या विधानानुसार, राजा दालिंदयेबो शुक्रवारी राजवाड्यात घुसला, ज्याच्या हातात कुऱ्हाड होती. खिडकी तोडून ते मुख्य राजवाड्यात पोहोचले. यानंतर राजवाड्यात गोंधळ उडाला. त्यानंतर दालिंदयेबो तेथून पळून गेले. सध्या पोलीस दालिंदयेबो यांचा शोध घेत आहेत.
First published:

पुढील बातम्या