लंडन, 1 जानेवारी : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या वडिलांना फ्रान्स देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज दिला आहे. ब्रेग्जिट करार अंतिम टप्प्यात आल्यानंतर तातडीने पीएम जॉन्सनच्या वडिलांनी घेतलेला हा निर्णय ब्रिटनच्या निर्णयाचा विरोध मानला जात आहे. बुधवारी ब्रिटीश संसदेने युरोपीय यूनियनसोबत ब्रेग्जिट ट्रेड कराराला मंजुरी दिली होती. ज्यानंतर पीएम जॉन्सन आणि क्वीन एलिजाबेथ द्वितीय यांनीही यावर स्वाक्षरी केली.
पीएम जॉन्सनचे वडील म्हणाले, मी कायम युरोपीय राहीन
बोरीस जॉन्सनचे वडील स्टॅनले जॉन्सन यांनी गुरुवारी सांगितलं की, ते फ्रान्सचं नागरिकत्व पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. ते पुढे म्हणाले की, यामध्ये फ्रान्सचे नागरिक होण्याची बाब महत्त्वपूर्ण नाही तर खरं पाहता मी फ्रेंचच आहे. माझ्या आईचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. त्यांची आई पूर्णपणे फ्रेंच होती, त्यांचे आजोबादेखील फ्रेंच होते. माझं जे मूळ आहे, तो मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. स्टॅनले जॉन्सन म्हणाले की, मी कायम युरोपीय राहीन. हे नक्की...तुम्ही मला ब्रिटीश म्हणू शकत नाही.
युरोपीय संसदेत सदस्य होते जॉन्सन यांचे वडील
बोरीस जॉन्सन यांचे वडील 80 वर्षांचे आहेत आणि ते युरोपीय संसदेत सदस्य राहिले आहेत. त्यांनी 2016 च्या जनमत संग्रहात ब्रिटनला युरोपीय संघासोबत राहण्याचं समर्थन केलं आहे. गुरुवारी रात्री 11 वाजता ब्रिटनचा युरोपीय संघासोबत आर्थिक नातेसंबंध तुटल्यानंतर ब्रिटनच्या नागरिकांनी युरोपी संघाअंतर्गत येणाऱ्या 27 देशात राहणे आणि काम करण्याचा (स्वत: मिळविलेला अधिकार) अधिकार गमावला. मात्र ज्यांच्याकडे दोन नागरिकत्व आहे, त्यांना हा अधिकार मिळेल.
काय आहे ब्रेग्जिट?
ब्रेग्जिट म्हणजे ब्रिटन+एक्जिट। ब्रेग्जिटचं सरळ अर्थ म्हणजे..ब्रिटनचं यूरोपियन यूनियनमधून बाहेर जाणं. ब्रिटनने वर्षभरापूर्वी युरोपीय युनियनमधून बाहेर जाणार असल्याची घोषणा केली होती. 2016 मध्ये ब्रिटनमध्ये यूरोपीय यूनियनमधून बाहेर निघण्यासाठी जनमत संग्रह घेतला होता. ज्यामध्ये तेथील लोकांनी मोठ्या संख्येत ब्रेग्जिटला समर्थन दिलं होते. याकारणास्तव तत्कालीन डेव्हिड कॅमरन सरकारला राजीनामा द्यावा लागला होता. माजी पंतप्रधान थेरेसा यांच्या कार्यकाळातही अनेक वेळा ब्रेग्जिट ट्रेल करारबाबत चर्चा झाली होती. मात्र समन्वय झाला नव्हता. ज्यानंतर बोरीक जॉन्सन यांच्या कार्यकाळात शेवटी युरोपीय युनियनसोबत ठराव मंजूर झाला.
युरोपीय युनियन कसा झाला तयार?
द्वितीय विश्व युद्ध समाप्त होत असताना युद्धात सहभागी झालेल्या सर्व देशांना मोठं नुकसान झालं होतं. हे युद्ध समाप्त झाल्याच्या पाच वर्षांनंतर फ्रान्स आणि जर्मनीने एक करार केला होता. ज्यात दोन्ही देश एकमेकांविरोधात युद्ध पुकारणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. या योजनेच्याअंतर्गत सहा देशांना 1950 मध्ये एका करारावर स्वाक्षरी केली, सात वर्षांनंतर रोममध्ये पुन्हा एक करार झाला होता. ज्यानंतर युरोपीय आर्थिक संघटनेचं (ईसीसी) गठन करण्यात आलं. या युरोपीय आर्थिक संघटनेला आज युरोपीय यूनियनच्या रुपात ओळखले जाते. 1973 च्या सुरुवातीला तीन नवीन देश यासोबत जोडले गेले. यामध्ये एक देश ब्रिटनहोता. वर्तमानात युरोपीय युनियनमध्ये 27 सदस्य आहेत आणि यांची एकूण लोकसंख्या तब्बल 50 कोटी आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.