Home /News /videsh /

सिगरेट ओढणाऱ्यांमध्ये Corona ची लागण होण्याचं प्रमाण कमी; फ्रान्स करणार निकोटिनचे उपचार

सिगरेट ओढणाऱ्यांमध्ये Corona ची लागण होण्याचं प्रमाण कमी; फ्रान्स करणार निकोटिनचे उपचार

सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा परिणाम फारसा झालेला नाही, असं दिसल्यानंतर आता चक्क कोरोनाग्रस्तांना निकोटिनचे डोस द्यायची चाचणी फ्रान्समध्ये सुरू करण्यात येणार आहे.

    पॅरिस, 24 एप्रिल : Coronavirus मुळे सर्वाधिक नुकसान झालेला एक देश असलेल्या फ्रान्समध्ये या विषाणूशी लढण्यासाठी नवनवे मार्ग शोधले जात आहेत. नव्या औषधांचे प्रयोग सुरू आहेत. त्यातच त्यांनी एक नवा शोध लावला आहे. सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा परिणाम फारसा झालेला नाही, असं दिसल्यानंतर आता चक्क कोरोनाग्रस्तांना निकोटिनचे डोस द्यायची चाचणी फ्रान्समध्ये सुरू करण्यात येत आहे. सिगरेटमध्ये निकोटिन असतं. ते आरोग्याला अपायकारक असतं, हे आतापर्यंत जगाला माहिती आहे. पण फ्रान्समध्ये झालेल्या एका अभ्यासात निकोटिनमुळे Coronavirus फुफ्फुसात टिकू शकत नाही, असं पुढे आलं. त्यामुळे निकोटिन पॅचेचचे उपचार रुग्णांवर सुचवले जात आहेत. या अभ्यासाला पुष्टी देण्यासाठी आणखी चाचण्या आणि प्रयोग होण्याची आवश्यकता आहे. पॅरिसमधल्या सुप्रसिद्ध रुग्णालयात 343 कोरोनाग्रस्तांचा अभ्यास करण्यात आली. त्याबरोबर सौम्य लक्षणं असणाऱ्या 139 रुग्णांचाही अभ्यास करण्यात आला. फ्रान्सच्या एकूण लोकसंख्येपैकी 35 टक्के लोक स्मोकिंग करणारे आहेत. पण व्हायरसची लागण झालेल्यांपैकी फक्त 5 टक्के स्मोकर आहेत. कोरोनाग्रस्तांपैकी बहुतेक जण सिगरेट न ओढणारे आहेत. अशाच प्रकारच्या अभ्यासाचा वृत्तांत गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये छापून आला होता. चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 1000 लोकांमध्ये फक्त 12.6 टक्के लोक सिगरेट ओढणारे होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये सिगरेट ओढणाऱ्यांचं प्रमाण 26 टक्के आहे. त्यामुळे चीनमध्येसुद्धा सिगरेट ओढणाऱ्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी दिसलं. VIDEO - लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी रुग्णवाहिकेत डांबलं, पुढे काय झाल पाहा विषाणूचा पेशींमधला प्रवेश निकोटिनमुळे रोखला जातो, असं गृहितक आहे, असं फ्रान्सच्या पास्टर इन्स्टिट्यूटमधल्या ज्येष्ठ न्यूरोबायोलॉजिस्टने सांगितलं. या अभ्यासात त्यांचाही सहभाग होता. निकोटिनचा वापर कोरोनारुग्णांवरच्या उपचारासाठी करण्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स करण्याची आवश्यकता आहे. त्यापूर्वी कोरोना रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेवकांना ते निकोटिन पॅचेच देणार आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग ते रोखू शकतात का हे पाहायचं आहे. निकोटिनचा उपचार म्हणून वापर करण्यापूर्वी त्याच्या वाईट परिणामांचा विचार होणं आवश्यक आहे. त्यामुळे सिगरेट ओढा, असं सरसकट सांगून चालणार नाही, असं फ्रान्सच्या आरोग्य भागाचे जेरोमी सोलोमन यांनी सांगितलं. अन्य बातम्या वर्दीसह आईचंही कर्तव्य बजावतेय कोरोना योद्धा, बाळाला कडेवर घेऊन करतेय ड्यूटी अमेरिकेत मृत्यूचा तांडव! कोरोनामुळे 50000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू, 15000 गंभीर ATM मधून पसरू शकतो कोरोना, पैसे काढताना घ्या ही काळजी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या