स्मार्टफोनच्या अति वापरानं होतेय नैराश्यात वाढ, अमेरिकेतल्या संशोधनात निष्कर्ष

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठानं स्मार्टफोनचा मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत केलेल्या सर्व्हेत बाहेर आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2018 12:45 PM IST

स्मार्टफोनच्या अति वापरानं होतेय नैराश्यात वाढ, अमेरिकेतल्या संशोधनात निष्कर्ष

28 जानेवारी : सध्याच्या डिजिटल युगात सगळ्यात जवळचा मित्र कोण असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे, आपला स्मार्टफोन.पण स्मार्टफोनसोबत असलेल्या मैत्रीचं रूपांतर व्यसनात झाल्यानं मुलांमध्ये नैराश्य येत असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतल्या एका संशोधनात काढण्यात आलाय.

स्मार्टफोन हा आता आपल्या दररोजच्या जगण्याचा भाग झालाय. एका क्लिकवर सर्व जगाशी कनेक्ट आणि माहितीचा ओघ असल्यानं अपडेट राहण्यासाठी स्मार्टफोनशी सर्वांची जवळीक वाढलीय. पण हीच जवळीक आता घातक ठरू लागलीय. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठानं स्मार्टफोनचा मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत केलेल्या सर्व्हेत बाहेर आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.

काय आहे संशोधन?

2017 पर्यंत अमेरिकेतल्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांकडे स्मार्ट फोन

अमेरिकेतले 33 टक्के मुलं नैराश्यानं ग्रस्त

Loading...

अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 23 टक्क्यांची वाढ

मुलं दररोज सरासरी 5 तास स्मार्ट फोनवर वेळ खर्च करतात

स्मार्टफोन सोबत असलेल्या मैत्रीचं केव्हा व्यसनात रूपांतर होतं हे मुलांना कळतही नाही. हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या खेळांचे भरमसाठ अॅप्स आणि पॉर्न फिल्म्स मुलांना सहज उपलब्ध होत असल्यानं रात्री उशिरापर्यंत मुलं स्मार्टफोनवर सर्फिंग करतात. त्यामुळं त्यांची झोपही नीट होत नाही.त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो.

अपुरी झोप, धावपळीचं जीवन, कामाच्या व्यस्ततेमुळं आई वडिलांचं मुलांकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळं मुलांवर सध्या नियंत्रण राहिलेलं नाही. त्याचबरोबर इंटरनेटच्या महाजालातल्या माहितीला चाळणी नसल्यानं घातक गोष्टींना मुलं बळी पडतात आणि त्याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो.

पालक, समाज आणि शिक्षक त्याचबरोबर माध्यमांनी वेळीच उपायोजना केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2018 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...