मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भयानक! लहान मूल अडकलं वॉशिंग मशिनमध्ये, त्यानंतर घडला अंगावर शहारे आणणारा प्रकार

भयानक! लहान मूल अडकलं वॉशिंग मशिनमध्ये, त्यानंतर घडला अंगावर शहारे आणणारा प्रकार

कपडे करा सॅनिटाइज

कपडे करा सॅनिटाइज

लहान मुलांना डोळ्यात तेल घालून जपावं लागतं. अन्यथा हे असे विचित्र अपघात होऊ शकतात. पालकांचे डोळे उघडणारी घटना

ख्राइस्ट चर्च, 22 फेब्रुवारी : वॉशिंग मशीन (washing machine) ही आजच्या काळातली गरज बनली आहे. धावपळीच्या दिवसात यात कपडे लवकर आणि स्वच्छ धुतले जातात. पण हेच वॉशिंग मशीन कधी कुणाच्या जिवावर उठलं असं सांगितलं तर खरं वाटेल? एक लहान मूल खेळता खेळता या मशीनमध्ये अडकलं आणि पुढे काय झालं हे ऐकून धक्का बसेल आणि अंगावर काटा येईल.

न्यूझीलंडच्या (New Zealand) ख्राइस्ट चर्च शहरात वॉशिंग मशीनमुळे एक भयानक गोष्ट घडली. एका निष्पाप मुलाचा जीव वॉशिंग मशीनमध्ये गेला (small child died in washing machine). त्याचे आई-वडील रडून-रडून अगदी त्रस्त झाले आहेत. सध्या या प्रकारचा तपास केला जातो आहे. मूल वॉशिंग मशीनमध्ये नक्की गेलं कसं कुणालाच कळलेलं नाही. आई-वडिलांचं म्हणणं आहे, की आम्हाला याबाबत काही माहीत नाही.

प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, वॉशिंग मशीनमध्ये अडकल्यानं मूल भयानक जखमी झालं. त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये (hospital) दाखलही केलं गेलं. मात्र दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला.

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता एक मूल जखमी झाल्याची माहिती मिळाली. या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांची टीम सध्या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आहे.

प्रॉडक्ट सेफ्टी कमिशनचं (product safety commission) याबाबत म्हणणं आहे, की 2014 पासून आजवर अशा प्रकारच्या केवळ 3 घटना समोर आल्या आहेत. यात 5 वर्षांहून कमी वर्षांच्या मुलांचे मृत्यू झाले. हे काही तितकंसं सोपं नाही पण आई-वडिलांनी त्यांच्या मुला-मुलींना अशा वस्तूंपासून दूर रहायला नीटपणे शिकवलं पाहिजे. या वस्तूंशी खेळ धोकादायक असू शकतो हे मुलांना कळलं पाहिजे.

हेही वाचा - VIDEO: 'आजपर्यंतचा सर्वात भारी शिक्षक', चिमुकल्याच्या आवाजानं शंकर महादेवन आवाक

या निष्पाप मुलाच्या मृत्यूवर डॉ. मेलानी कोकर म्हणाल्या, की आम्ही प्रयत्नांची शर्थ करूनही मुलाला वाचवू शकलो नाही. आम्ही कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.'

First published:

Tags: Accident, New zealand, Small child