मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हेअरकट आवडला नाही म्हणून इतका राग! 10 वर्षांच्या मुलानं बोलावले पोलीस आणि मग...

हेअरकट आवडला नाही म्हणून इतका राग! 10 वर्षांच्या मुलानं बोलावले पोलीस आणि मग...

हेअरकट आवडला नाही म्हणून त्यानं चक्क पोलिसांना बोलावलं. पोलीस (Police) आल्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला.

हेअरकट आवडला नाही म्हणून त्यानं चक्क पोलिसांना बोलावलं. पोलीस (Police) आल्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला.

हेअरकट आवडला नाही म्हणून त्यानं चक्क पोलिसांना बोलावलं. पोलीस (Police) आल्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 14 मे : सलूनवाल्याने हेअरकट बिघडवला, कपडे शिवताना माप किंवा डिझाईन चुकलं तर अनेकांचा राग अनावर होतो. या रागाच्या भरात लोक अनेक भन्नाट कारनामे करतात. एका 10 वर्षांच्या मुलानंही असाच पराक्रम केला आहे. हेअरकट (heir cut) आवडला नाही म्हणून त्यानं चक्क पोलिसांना बोलावलं. पोलिसांना (Police) आल्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला. तेव्हा मात्र त्यांनी या मुलाची समजूत काढतानाच अशा प्रसंगी पोलिसांना बोलावून त्यांचा वेळ घालवू नये, असे त्याच्या मोठ्या बहिणीलाही समजावलं.

चीनमध्ये एका 10 वर्षांच्या मुलानं त्याची नवीन केशरचना आवडली नाही म्हणून पोलिसांना बोलावल्याचे प्रकरण स्थानिक माध्यमे आणि सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच गाजत आहे. ही घटना चीनच्या नैऋत्य भागातील अंशुन शहरात घडली आहे. सलूनवाल्याने त्याचे केस कापल्यानंतर काही काळ हा मुलगा आपली नवी केशरचना काळजीपूर्वक आरशात पाहात राहिला. त्यानंतर तो निराश होऊ लागला आणि त्याच्या निराशेचे रूपांतर हळूहळू रागात होऊ लागलं. काही क्षणांनंतर त्याच्या चेहऱ्यावरच्या रागाची जागा भावनिकतेने घेतली आणि त्यानं जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. केसांवरून हात फिरवत आणि गोंधळ घालतच त्याने पोलिसांना फोन केला.

काही वेळाने पोलीस सलूनवाल्याच्या दुकानात पोहोचले. जेव्हा पोलिसांना हा संपूर्ण प्रकरण समजले, तेव्हा त्यांनी मुलाच्या मोठ्या बहिणीला विचारले की, तिने या प्रकरणात हस्तक्षेप करून तिच्या भावाला पोलिसांना फोन करण्यापासून का रोखणे गरजेचे होतं.

हे वाचा - Sputnik भारतात नवी लस उपलब्ध; कुणाला मिळाला पहिला डोस, किंमत किती, जाणून घ्या सर्व माहिती

यानंतर मुलीनं पोलिसांना सांगितलं की, ती आपल्या भावाला समजावून सांगेल. तसेच, अशा छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये पोलिसांना बोलवून त्यांचा वेळ वाया घालवू नये, असेही सांगेन. जेव्हा अशा प्रकारची कोणती समस्या येईल, तेव्हा पोलिसांऐवजी आपल्या पालकांशी बोलून त्यांना याची कल्पना देईन. या मुलाच्या कृत्यामुळे पोलिसांना विनाकारण त्रास झाला असला तरी या मुलाच्या समर्थनार्थ अनेक लोक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

हे वाचा - ‘घरात अन्नाचा कणही नाही’; घरकाम करणाऱ्या महिलेची कहाणी ऐकून पोलिसांचे डोळेही पाणावले

ही घटना चीनच्या सोशल मीडिया साइट वाईबोवर मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आली आहे. बर्‍याच लोकांनी या मुलाचे समर्थन केले आहे. ‘एखाद्या लहान मुलाकडे मोठ्यांनी लहान समजून दुर्लक्ष करू नये,’ असे म्हटले आहे. तर, दुसऱ्या एका व्यक्तीनं म्हटले की, हा मुलगा लहान असूनही त्याच्या मताबद्दल खूपच स्पष्ट आहे. ही बाब त्याचा आत्मविश्वास दर्शवते.

First published:

Tags: Social media viral, Viral