दोन महिने झोपा आणि घसघशीत पगार घ्या

दोन महिने झोपा आणि घसघशीत पगार घ्या

झोपायला आवडणाऱ्या लोकांसाठी फ्रान्समधील संशोधन संस्थेने एका नोकरीची 'ऑफर' जाहीर केली आहे. दोन महिने तुम्ही नुसत्या झोपा काढायच्या आणि त्याबद्दल ही संस्था तुम्हाला घसघशीत पगारही देण्यास तयार आहे.

  • Share this:

08 एप्रिल : झोपायला आवडणाऱ्या लोकांसाठी फ्रान्समधील संशोधन संस्थेने एका नोकरीची 'ऑफर' जाहीर केली आहे. दोन महिने तुम्ही नुसत्या झोपा काढायच्या आणि त्याबद्दल ही संस्था तुम्हाला घसघशीत पगारही देण्यास तयार आहे. फ्रान्समधील स्पेस मेडिसीन अँड फिजिऑलॉजी या संस्थेला दोन महिन्यांसाठी झोप काढू शकणाऱ्या व्यक्तीची आवश्‍यकता आहे. यासाठी त्या व्यक्तीला 17 हजार डॉलर्स देण्याची या संस्थेची तयारी आहे. सूक्ष्म गुरुत्वीय बलाचे शरीरावरील परिणाम जाणून घेणे, हे या प्रयोगामगचे उद्दिष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील वातावरणात राहण्याच्या दृष्टीने या प्रयोगाला महत्त्व आहे. मात्र, झोप काढणंही सोपं काम नाही, हे या संस्थेच्या अटींवरून लक्षात येते. या कामासाठी केवळ पुरुष उमेदवार आवश्‍यक आहे. ती व्यक्ती 20 ते 45 या वयोगटातील निर्व्यसनी असावी. या व्यक्तीचं आरोग्य उत्तम असावं, तिला कोणतीही अॅलर्जी नसावी, दैनंदिन आयुष्यात मैदानी खेळाचा सराव असावा आणि तिचा 'बॉडी मास इंडेक्‍स' 22 ते 27 दरम्यान असावा, या संस्थेच्या काही अटी आहेत.

ही पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तीने सुरुवातीला तीन महिने प्रयोगाचा अभ्यास करण्यात घालवणं आवश्‍यक आहे. त्यानंतर त्यांनी संपूर्ण दोन महिने बिछान्यावरच झोपून काढणं आवश्‍यक आहे. यावेळी तिचं डोकं किमान सहा अंश खालील बाजूस झुकलेलं असावं. या दरम्यान संबंधित व्यक्तीने बिछान्याखाली उतरायचं नाही.

First published: April 8, 2017, 10:49 AM IST

ताज्या बातम्या